नाफेडच्या अधिकाऱ्यासह सचिवाचे पलायन
By Admin | Updated: May 4, 2017 00:42 IST2017-05-04T00:42:01+5:302017-05-04T00:42:01+5:30
बाजार समितीमध्ये नाफेडच्या केंद्रावर तूर आणलेल्या शेतकऱ्यांची नावे गहाळ करून इतरांची नावे चढविली.

नाफेडच्या अधिकाऱ्यासह सचिवाचे पलायन
कृउबासतील प्रकार : ४० बोगस नावांचा शिरकाव
आर्वी : बाजार समितीमध्ये नाफेडच्या केंद्रावर तूर आणलेल्या शेतकऱ्यांची नावे गहाळ करून इतरांची नावे चढविली. ही बाब माहिती होताच प्रहारने सचिव व अधिकाऱ्याला घेराव करीत शेतकऱ्याचे तुरीचे ढीग दाखवा, असे सांगितले. तुरीचे ढीग दाखविताना सचिव व अधिकाऱ्याने मात्र पलायन केले. ही घटना बुधवारी सकाळी बाजार समितीत घडली.
नाफेडची तूर खरेदी २२ एप्रिल रोजी बंद झाली. त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजेर्पंत येथे तूर विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंदणी करण्यात आली. यावेळी यादीत केवळ २० शेतकऱ्यांची नावे होती. त्या यादीचे फोटो गुल्हाणे या शेतकऱ्याने काढून ठेवले होते. २३ एप्रिल ते ३ मे या १० दिवसांत बाजार समितीत मोठा घोळ करण्या आला. २० शेतकऱ्यांची यादी ६० वर पोहोचली. तब्बल ४० बोगस नावे यादीत टाकली गेली. ज्यांची नावे टाकली, ते शेतकरी आहे की व्यापारी, हे कळायला मार्ग नाही. २२ एप्रिलच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे गहाळ करून त्या ठिकाणी दुसरी नावे टाकण्यात आलीत.