शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

निसर्गाची ४३ हजार हेक्टर सोयाबीनवर आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST

जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ केली पण, सरुवातीला बोगस बियाण्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज : सततचा पाऊस, किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कापूस विक्रीचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी त्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. पण, सततचा पाऊस आणि विविध किडीच्या प्रादुर्भावाने जवळपास ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. यापैकी बहूतांश पीक हाताबाहेर गेले असून शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या आणि पावसाने उघडीप दिली तर काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. तरीही यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ केली पण, सरुवातीला बोगस बियाण्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले. त्यानंतर सततच्या पावसामुळे सोयाबीनची झपाट्याने वाढ झाली पण, झाडाला मोजक्याच शेंगा लागल्या आहे. काही परिसरात शेगा परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. यासोबतच येलो मोझॅक, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी आणि खोडमाशीने सोयाबीनवर अटॅक केला आहे. त्यामुळे शेतातील हिरवेगार सोयाबीन जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. बºयाच भागातील सोयाबीन पिवळे पडायला लागल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. काही शेतकºयांनी सोयाबीनमध्ये जनावरे चारायला तर काहींनी पीक उपटून फेकायला सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन बाधित झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असण्याची शक्यता आहे.त्यामुळे यावर्षी निसर्गकोपाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच कंबरडे मोडले असून शासनाने त्वरीत सर्वेक्षण करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीनला युरियाचा डोज जास्त झाल्याने सोयाबीन वाढले पण, शेंगा लागण्याचे प्रमाण कमी आहे. उशिरा शेंगा लागण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. सध्या किडीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीनला फटका बसला आहे. पावसाने उघडीप दिली आणि शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यास काही प्रमाणात यातील पीक हाती लागू शकते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्या.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.शेतकऱ्यांनो... अशा करा उपाययोजनाशेतात पाणी साचू देऊ नये. साचले असेल तर नाली तयार करून पाणी शेताबाहेर काढून घ्यावे. पिवळे चिकट सापळे प्रति एकरी दहा या प्रमाणात लावावेत. पांढºया माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीडनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकाचे पाने पिवळी झालेली व पानाच्या शिरा हिरव्या असल्याचे दिसून येत असतील तर हा प्रकार लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. त्यावर उपाय म्हणून त्वरीत ५० ग्रॅम फेरस सल्फेट + २० ग्रॅम झिंक सल्फेट + २५ ग्रॅम खाण्याचा चुना १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.सोयाबीन पिकामध्ये खोड माशी व चक्रभुंगा किडीचा प्रादूर्भाव आढळल्यास इथिऑन ५०% इसी कीडनाशक १५ ते ३० मिली (प्रदूभार्वाची तीव्रता लक्षात घेऊन) किंवा क्लोरणट्रनिलिप्रोल १८.५ % एससी ३ मिली यापैकी कोणतेही एक किडनाशक प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक किडनाशकांची, बुरशीनाशकाची एकत्रितपणे फवारणी करू नये. फवारणी करतांना योग्यती सुरक्षेची काळजी घेऊनच फवारणी करावी.कारंजा (घा.) : तालुक्यामध्ये सोयाबीनचे पीक खोडअळीने नष्ठ झाले असतानाच कपाशीही धोक्यात आली आहे. अतिपावसामुळे झाडांची वाढ खुंटली असून झाडे जळायला लागली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संक टात असताना आजी-माजी आमदार श्रेयवादात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांनी हा वाद सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. कृषी विभागानेही तात्काळ शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना अनुदान देण्याची मागणी होत आहे.रोहणा : परिसरात मागील चार-पाच दिवसांपर्यंत हिरवे असलेले सोयाबीन आता पिवळे पडून वाळत आहे. हिरव्या झाडांना देखील अत्यल्प शेंगा असल्याचे शेतकरी चिंताग्रस्त आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशी व तूर या पिकांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. सोयाबीन हातचे जाण्याची स्थिती असून कपासीवरील बुरशीने पाती-फुल गळ झाली आहे. अपर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले. रोहणा, सायखेडा, दिघी, वडगाव, धनोडी येथील शेतकऱ्यांची शेतं पाण्याखाली आले आहे. त्यामुळे हे पीकही हातचे जाण्याची शक्यता बळाली आहे. त्यामुळे सर्वे करुन शेतकºयांना त्वरीत अनुदान देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य माया नायसे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.चिकणी (जामणी) : गेल्या वर्षी कापूस उत्पादकांची कोंडी झाल्याने यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी सततच्या पावसाने सोयाबीनची झपाट्याने वाढ झाली पण, झाडांना शेंगाच दिसत नसल्याने सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे. एक महिन्यापासून पावसाने पाठ सोडली नाही. आताही ढगाळ वातावरण कायम असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाडांची फुल गळली असून पानेही कातरायला सुरुवात झाली आहे. पढेगाव येथील मनोहर चक्रधरे, गजानन दुर्गे यांच्यासह चिकणी येथील मनोहर काकडे यांच्यासह इतर शेतकºयांची हीच स्थिती आहे. शेतकºयांनी तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.देवळी : तालुक्यात सोयाबीनला शेंगा न आल्यामुळे शेतकऱ्यावर गंभीर संकट ओढवले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या ३३५ च्या वाणाला काहीच शेंगा नसल्याची ओरड आहे. काहीना पाच-दहा शेंगा असल्यातरी त्या भरल्या नसल्याने यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम पाण्यात गेल्यागत आहे. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी शेंगा नसलेल्या सोयाबीनचे रोपटे घेवून तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे या समस्येकडे लक्ष वेधत आहे. मुरदगाव (खोसे) येथील हरिश रमणलाल ओझा या शेतकºयाने ४० एकरात ३३५ वाणाचे सोयाबीन लावले. सोयाबीनचे पीक कंबरेपर्यंत उंच वाढले परंतु या वाणाला शेंगा न आल्यामुळे त्यांनी संबंधित दुकानदार व कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. तसेच चिकणी येथील रामदास सुर्यभान सावळे यांच्या शेतात सुद्धा हीच परिस्थिती आहे.वायगाव (नि.) : कोरोना महामारीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकºयांनी कसेबसे सावरत सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यात बहुंताश सोयाबीन उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीन चांगले बहरल्याने चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र, सततचा पाऊस आणि ढगाळी वातावरण अळींकरिता पोषक ठरल्याने त्यांनी पिकांवर आक्रमण केले. सोयाबीनवर खोडअळी आल्याने शेंगा गळती सुरु झाली. परिणामी वायगाव (निपानी), नेरी, मिरापूर, तळेगाव (टा.), सिरसगांव, भिवापूर, सेलु काटे व इतर गावातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन अपटून जनवारांना चारत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती