वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात साजरा केला राष्ट्रीय मतदान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 16:05 IST2023-01-25T16:04:55+5:302023-01-25T16:05:43+5:30
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात साजरा केला राष्ट्रीय मतदान दिन
आज जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा निवडणूक विभाग व यशवंत महाविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, सहायक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, रजनीश कुमार शुक्ल कुलपती महात्मा गांधी आं. हि. विश्वविद्यालय वर्धा, प्रवीण महिरे निवडणूक अधिकारी, विवेक देशमुख, सचिव विधी सेवा प्राधिकरण, यांच्या सह अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय मतदान दिन प्रतिज्ञा घेतली व यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीनं पथनाट्य सादर करण्यात आले. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना देण्यात आले.