राष्ट्रध्वज सन्मान अभियान
By Admin | Updated: August 13, 2016 00:50 IST2016-08-13T00:50:10+5:302016-08-13T00:50:10+5:30
भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात येत आहे.

राष्ट्रध्वज सन्मान अभियान
वर्धा : भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात येत आहे. १५ आॅगस्टला अनावधानाने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी रस्त्यांवर पडून असलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, शहीदांचे स्मरण करून युवकांमध्ये देशभक्ती जागृत करणे, राष्ट्रध्वज पायदळी तुडविल्या जाणार नाही याची काळजी घेण्याबद्दल भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संघटक निरज बुटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक किल्लेकर, पोलीस उपअधीक्षक जाधव, निरीक्षक शिरतोडे, निरीक्षक मगर यांना निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)