नांदपूरच्या दिव्याचा ‘स्मार्ट व्हीलेज’ आयडिया एक्सचेंजमध्ये

By Admin | Updated: January 14, 2016 02:52 IST2016-01-14T02:52:12+5:302016-01-14T02:52:12+5:30

नांदपूर येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या थूल हिने मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांच्यासह केरळ मधील एर्नाकुलम....

Nandpur's 'Smart Vehicle' on Idea Exchange | नांदपूरच्या दिव्याचा ‘स्मार्ट व्हीलेज’ आयडिया एक्सचेंजमध्ये

नांदपूरच्या दिव्याचा ‘स्मार्ट व्हीलेज’ आयडिया एक्सचेंजमध्ये

केरळमध्ये मारली बाजी : प्रकल्प ग्रामीण भागात कार्यान्वित करण्यासाठी घेतली विशेष माहिती
आर्वी : नांदपूर येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या थूल हिने मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांच्यासह केरळ मधील एर्नाकुलम येथे ४२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात स्मार्ट व्हिलेज हा प्रकल्प सादर केला. सदर प्रदर्शन एनसीईआरटी दिल्ली यांच्या मार्फत भरविले जाते. दिव्याने सादर केलेल्या स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पाची विशेष दखल या राष्ट्रीय प्रदर्शनात घेण्यात आली. यांनतर आयडीया एक्सचेंज येथे हा प्रकल्प सादर करण्यात आला.
केरळ येथील प्रदर्शनामध्ये भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश यामधून एकूण २११ प्रकल्प सादर करण्यात आले. एनसीईआरटीने यापैकी केवळ १९ प्रकल्पाची विशेष दखल घेत त्याचे विशेष पुस्तक प्रदर्शनामध्ये प्रसिद्ध केले. यात दिव्याचा स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचा समावेश आहे.
शिवाय आयडीया एक्सचेंज या विशेष सादरीकरणासाठी भारतातील पहिल्या चार प्रकल्पामध्ये तिचा प्रकल्प निवडण्यात आला. यात गोवा, बडोदा (गुजरात), बंगलोर (कर्नाटक) व नांदपूर (महाराष्ट्र) या प्रकल्पांचा समावेश होता. दिव्याने आयडिया एक्सचेंजच्या विशेष कार्यक्रमात पी.पी.टी.द्वारे सर्व भारतीयांसमोर स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातून आलेल्या दिव्याच्या सुत्रबद्ध आणि आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणाला सर्व उपस्थित भारतीयांनी विशेष दाद दिली. एनसीईआरटीचे निदेशक डॉ. वझलवार, डॉ. रचना गर्ग यांनी विशेष प्रभावित होऊन दिव्याचे कौतुक केले.
दिव्याचा प्रकल्प ग्रामीण विकासासंबंधी असल्यामुळे प्रसिद्ध भारतीय अवकाश संशोधक, इसरोचे माजी अध्यक्ष व इंडियन इंन्स्टिट्युट आॅफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष पद्मविभूषण के. राधाकृष्णन यांनी दिव्याच्या प्रकल्पाची विशेष विचारपूस केली. केरळच्या डॉ. जया यांनीही सदर प्रकल्प ग्रामीण भागात कसा राबविता येईल याबाबत माहिती जाणून घेतली. यशाबद्दल दिव्या व तिचे मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र चौधरी यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. दिव्यांच्या प्रकल्पाला शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना निमकर यांनीही मोलाचे सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nandpur's 'Smart Vehicle' on Idea Exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.