शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नालवाडी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:17 PM

ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : गुणवंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.नालवाडी ग्रा. पं. च्यावतीने रविवारी खा. तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत आणि सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे होते. उद्घाटन जि.प. सदस्य नुतन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, प.स.सदस्य चंदा सराम, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर, उपसरपंच महेश शिरभाते, लोकमतचे जिल्हाप्रतिनिधी अभिनय खोपडे आदी उपस्थित होते. आ. डॉ. पंकज भोयर यांनी नालवाडी ग्रा.पं.च्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. नालवाडी, महाकाळ व पवनार येथील बचत गटाच्या महासंघाला सभागृह उपलब्ध करून द्यायचे आहे. नालवाडीने ग्रा.पं.ने जागा उपलब्ध करून दिल्यास. २१ लक्ष रूपयाचा निधी दिला जाईल असे सांगितले. प्रास्ताविक सरपंच प्रतिभा माऊस्कर, संचालन प्रा.संदीप पेठारे यांनी केले तर आभार सदस्य वैशाली सातपुते यांनी मानले. माजी प.स.सभापती बाळसाहेब माऊस्कर, प्रमोद राऊत, ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक यांच्यासह ग्रा.प.सदस्य व नागरिक उपस्थित होते.यांचा झाला सत्कारसिध्दी पडके, मयुरी मडावी, हर्षल सोनवने, ईषा चरडे, मृणाल भगत, राणी द्रवेकर, वेदांती हरणे, प्रणय कोपरकर, चंचल शिंदे, आकाश मिटकरी, हर्षाली वानखेडे, वेदांती कुकडकर, राम मुडे, श्रेयांक हाडेकर, सर्वांग ढोले, मुयरी हाडके, सजल वनकर, सुज्वल देशमुख, चिन्मय अनंत भाकरे या गुणवंतांचा सत्कार झाला. सामाजिक कार्यासाठी तुषार देवढे, झामरे, हेमंत नरहरशेट्टीवार, सारंग चोरे, उत्तम ढोबळे, सुधीर सगणे, महेंद्र शिंदे, सिमरण खान, रिना कावळे, सुरेश दमके, अश्वजीत जामगडे, सुनीता मेहरे-तडस, मंदा मासोदकर, माधुरीदिदी, अनिता शेंडे, लक्ष्मण धनवीन, डॉ.इंदुमती कुकडकर, प्रभाकर पुसदकर, मुरलीधर बेलखोडे, प्रा.मोहन गुजरकर, अभिमन्यू पवार, धर्मराज पाकुजे, मनोहर जळगावकर, संजय कापसे, डॉ.गोपाल पालिवाल, पतजंली योग समितीचे योग प्रशिक्षक, आधारवड समितीचे जेष्ठ नागरिक, अंकुश उचके, प्रा.नवनीत देशमुख, प्रा.किशोर वानखेडे, आशिष गोस्वामी, पुरूषोत्तम टानपे यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत