शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अबब! देशात सॅनिटरी नॅपकिन्सचा महिन्याकाठी २३ हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:24 IST

भारतीय स्त्रियांपैकी ५७.६ टक्के म्हणजे १७ कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरतात. प्रत्येक महिन्याला १२ या हिशेबाने वापरलेल्या २०४ कोटी नॅपकिन्सचे वजन २३ हजार टन होते.

ठळक मुद्देविल्हेवाटीच्या पद्धतीमुळे पर्यावरण व आरोग्य धोक्यात ४०० वर्षे नष्ट होत नाहीत सॅनिटरी नॅपकिन्स

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे २०१५-१६ नुसार भारतात ५७.६ टक्के स्त्रिया नॅपकिन्सचा वापर करतात. १५ ते ५४ वयोगटातील ३० ते ३५ कोटी भारतीय स्त्रियांपैकी ५७.६ टक्के म्हणजे १७ कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरतात. प्रत्येक महिन्याला १२ या हिशेबाने वापरलेल्या २०४ कोटी नॅपकिन्सचे वजन २३ हजार टन होते. सर्वच स्त्रियांनी नॅपकिन्स वापरल्यास किती टन कचरा वाढेल याचा अंदाज करणे कठिण आहे. यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सच्या योग्य विल्हेवाटीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे.सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याच्या प्रचलित पद्धती सध्या धोकादायक ठरत आहेत. महिलांकडून पेपर, प्लास्टिकमध्ये गुंडाळून नॅपकिन्स कचरापेटीत टाकणे वा बाहेर फेकणे, शौचालायात फेकून देणे, कशातही न गुंडाळता वस्तीतील गटारात, जवळच्या नाल्यांमध्ये फेकणे, इतर कचऱ्यासोबत जाळणे व खड्डा करून पुरणे या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावली जाते; पण यामुळे अनेक धोके निर्माण होतात.९० टक्क्यांपेक्षा अधिक नॅपकिन्समध्ये जैविकरित्या डिग्रेड होऊ न शकणाऱ्या क्रूड आॅइल, प्लास्टिक, पॉलिमर्सचा वापर होतो. ते जैवोपघटनीय (बायोडिग्रेडेबल) नाही. यामुळे ते नष्ट होण्याकरिता सुमारे ४०० वर्षे लागतात. त्यावर पुनर्प्रक्रियाही होऊ शकत नाही. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका आहे. वापरून फेकून देत असलेल्या या नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे, पर्यावरण व आरोग्यावर त्याचा किती विपरित परिणाम होत आहे, याची कल्पना येते. शिवाय शौचालये तुंबण्याच्या समस्या वाढत असून सांडपाण्याची व्यवस्था ब्लॉक होते.पक्षी, कोंबडा, कुत्रे, मांजरी, गाई-गुरे यांच्याही पोटात अनेकदा हा कचरा जातो.यातून प्राण्यांना आजार होऊन रोगराई पसरण्याचा धोका असतो. स्त्रियांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापराचा पुरस्कार करणाºया शासनानेही नॅपकिन्स विल्हेवाटीचा गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्रामचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय व सीसीआरएएस यांच्याकडे केली आहे.सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराचा शासनाकडून पुरस्कार केला जातो; पण त्यांची विल्हेवाट लावण्याकरिता कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. परिणामी, प्लास्टिकप्रमाणेच सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरण व आरोग्यासाठी बाधक ठरत आहे. शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करीत नॅपकिन्सच्या योग्य विल्हेवाटीसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्न