चोरीच्या संशयातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:19+5:30

आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून आला होता.

Murder of a youth on suspicion of theft | चोरीच्या संशयातून युवकाची हत्या

चोरीच्या संशयातून युवकाची हत्या

ठळक मुद्देसुसुंद्रा येथील घटना : आरोपी पिता-पुत्रांना अटक, सहआरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुचाकी चोरी केल्याच्या संशयातून युवकाच्या डोक्यावर उभारीने मारून हत्या करण्यात आली. कारांजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी ही घटना उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली.
गजानन सलामे (२३) रा. सुसुंद्रा असे मृताचे नाव आहे. दादाराव ढोले, वसंता दादाराव ढोले आणि गोपीचंद दादाराव ढोले अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून आला होता. आपली बदनामी होणार, या तीतीने रात्रीच्या सुमारास गजानन हा ढोले यांच्या घरावर चालून गेला आणि घरातील महिला तसेच मुलाबाळांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. गजाननने दिलेल्या धमकीने गावातील नागरिकांनी त्याला चोप दिला. रक्ताच्या थारोळ्यात गजानन पडून असल्याचे पाहून त्याची आजी आणि नातेवाईकांनी त्याला एका चादरीत बांधून घरी नेत खाटेवर टाकले. याच कारणातून दादाराव ढोले आणि त्यांच्या दोन मुलांनी गजानन सलामे याच्या डोक्यावर आणि हातावर उभारीने मारहाण करून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना सोमवारी उघडकीस येताच सुसुंद्रा गावात एकच खळबळ उडाली. आष्टीचे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तसेच वर्ध्यातून ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. कलावती सखाराम इरपाचे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

मृतदेह रात्रभर पडून होता रक्ताच्या थारोळ्यात
सुसुंद्रा गावात गजानन सलामे याची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री ही घटना घडली. मात्र, पोलिसांना या घटनेविषयी कुणीही दिली नाही. पोलीस पाटलाने याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मृतक गुन्हेगारी प्रवृत्तीचा
मृत गजानन सलामे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. घरफोडी, चोरी, दुचाकी जाळपोळ करणे आदी विविध गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. गावातील नागरिकांना त्याचा त्रास होता, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Murder of a youth on suspicion of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून