लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): नजीकच्या जळगाव येथे एका शेताच्या धुऱ्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नितीन नागोसे (२८) रा. जळगाव असे मृताचे नाव असून अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.पोलीस सूत्रानुसार, मृतक नितीन हा हमालीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. अशातच गावातील एका विवाहितेसोबत त्याचे सूत जुळले. त्यानंतर त्याचे त्या महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू सुरू झाले. विशेष म्हणजे, या महिलेलाही दारूचे व्यसन आहे. यामुळे त्यांच्यात बहुधा शाब्दिक चकमक व्हायची. या अनैतिक संबंधाची कुणकुण महिलेच्या मुलाला आणि पतीला लागल्यानंतर मृतकाला समज देण्यात आली. पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. काल नेहमीप्रमाणे नितीन हा महीलेच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला. त्यानंतर महिलेचा पती, महिला आणि नितीन या तिघांनीही दारू ढोसली. दरम्यान महिलेच्या अल्पवयीन मुलाने तेथे येत जवळ असलेल्या कुºहाडीने नितीनवर वार केले. दरम्यान त्याला आरोपी महिला व तिच्या पतीनेही साथ दिली. याच मारहाणीत नितीनची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतशिवारात नेऊन फेकण्यात आला. सकाळी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.मृतदेह दिवसभर घरातकुºहाडीने मारहाण करून नितीनला गतप्राण केल्यानंतर त्याचा मृतदेह आरोपींनी सूर्य मावळतीला जाईपर्यंत घरातच ठेवला. त्यानंतर आरोपींनी नितीनचा मृतदेह काळोखाचा फायदा घेत नजीकच्या शेताच्या धुºयावर नेत फेकून दिला. तसेच तेथून यशस्वी पळ काढला. सकाळी याच भागातून जात असलेल्या एका महिलेला मृतदेह आढळून आल्याने तिने आरडा-ओरड करीत गावातील नागरिकांना याची माहिती दिली. बघता-बघता घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी झाली. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
जळगावात तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:16 IST
नजीकच्या जळगाव येथे एका शेताच्या धुऱ्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नितीन नागोसे (२८) रा. जळगाव असे मृताचे नाव असून अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
जळगावात तरुणाची हत्या
ठळक मुद्देअनैतिक संबंधाचा वाद विकोपाला। संगनमत करून कुऱ्हाडीने केले वार