धर्ती येथे महिलेची हत्या
By Admin | Updated: May 16, 2015 02:10 IST2015-05-16T02:10:04+5:302015-05-16T02:10:04+5:30
तालुक्यातील धर्ती गावातील शांता रामचंद्र कडवे (५०) या महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

धर्ती येथे महिलेची हत्या
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील धर्ती गावातील शांता रामचंद्र कडवे (५०) या महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सदर महिला अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आहे. ही घटना गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघड झाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई कडवे ही एकटी राहत होती. गुरूवारी रात्री तिची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिच्या डोक्यावर व गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. तिची हत्या सकाळी १०.३० ते रात्री ७.३० वाजताच्या सुमारास झाली. ती एकटी राहत असल्याने तिच्या घराकडे कोणी भटकले नसल्याने रात्री उशिरा ही घटना पुढे आली. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असुन तपास ठाणेदार विनोद चौधरी करीत आहे. यातील आरोपी लवकरच गजाआड होईल असे पोलिसांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)