जादूटोण्यातून ‘त्या’ इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:25+5:30

कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे याला खात्रिदायक माहितीच्या आधारे ताब्यात घेत विचारपूस केली.

Murder of 'that' Isma through witchcraft | जादूटोण्यातून ‘त्या’ इसमाची हत्या

जादूटोण्यातून ‘त्या’ इसमाची हत्या

ठळक मुद्देआरोपी अटक : काठीने डोक्यावर जबर प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नजीकच्या सोनेगाव (खुनकर) येथील रहिवासी गजानन गणपत आडे (५५) याच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे (४८) रा. सोनेगाव (खु.) याला पोलिसांनी अटक केली असून जादूटोण्याच्या संशयातून गजाननची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास मारोती कुमरे याला खात्रिदायक माहितीच्या आधारे ताब्यात घेत विचारपूस केली. सुरूवातील उडवा-उडवीचे उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी हिसका मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी व मुलगा याच्यावर करनी केल्याचा ठपका ठेऊन गजाननला आपणच काठीने मारहाण केल्याचे आरोपी देविदास याने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणातील आरोपी देविदास याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला अल्लीपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या आरोपीची पोलीस कोठडी पोलिसांनी मिळविली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखेडे, पोहवा नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे यांनी केली.

Web Title: Murder of 'that' Isma through witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून