गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:12+5:30
श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शुभम जगताप हा घरी असताना रोहीत हा त्याच्या घरी आला.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/पुलगाव : येथील सुभाषनगरात जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने तिघांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाला जबर मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली असून रोहीत मनोज गौनधरे उर्फ डंभारे रा. पुलगाव असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी तीन आरोपींना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शुभम जगताप हा घरी असताना रोहीत हा त्याच्या घरी आला. त्यानंतर रोहीत आणि शुभम जगताप हे दोघे घराशेजारी गोष्टी करीत असताना तेथे श्रीकांत भस्मे तसेच त्याचे दोन साथीदार हातात शस्त्र घेऊन आलेत. त्यांनी आमच्याशी नेहमी वाद का करतो, असे म्हणत रोहीतला जबर मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी शुभम जगताप हा गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. शुभम जगताप याने आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रोहीतला मृत घोषित केले. तर जखमी शुभम जगताप याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी श्रीकांत भस्मे, अनिल भस्मे व या दोघांना साथीदार असलेल्या एका अल्पवयीन व्यक्तीला पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतावर हाणामारीसह दारूबंदी अन्वये गुन्हे दाखल
मृतक रोहीत याच्यावर मागील काही दिवसांपूर्वीच जबर मारहाण केल्या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर तो छुप्या पद्धतीने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वयेही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पाईप, विळा, लाकडी दांडा केला जप्त
रोहीत व शुभम जगताप याला जबर मारहाण करण्यासाठी आरोपींनी लोखंडी पाईप, विळा तसेच दांड्याचा वापर केला. आरोपींनी मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात शस्त्र म्हणून वापरलेले हे साहित्य पुलगाव पोलिसांनी जप्त केले आहे.
एसडीपीओंनी केली घटनास्थळाची पाहणी
हत्येची माहिती मिळताच पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक मुजबैले, विवेक बन्सोड आदींनी घटनास्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला.