शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नळ नसेल तर पोहोचतो नगरपालिकेचा टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:42 IST

शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । खासगी टँकरचे दर हजारापासून सतराशे रुपयांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत. ‘लोकमत’ने शनिवारी सकाळी ‘टँकरवारी’चा आढावा घेतला. ज्या भागात नळाचा पाणीपुरवठा १० दिवसानंतर होत आहे, त्या भागातील वॉर्ड व प्रभागात टँकर पाठविला जातो. या भागातील नागरिकांनी आपल्या घरासमोर प्लास्टिक ड्रम ठेवलेले आहेत. प्रत्येक घराला १ ड्रम याप्रमाणे पाणी वाटप नगरपालिकेचा टँकर करतो, असे दिसून आले. नगरपालिकेचा टँकर आल्यावर काही भागात नगरसेवक टँकरसोबत असल्याचेही दिसून आले. वॉर्डातील प्रत्येक भागात नागरिकाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले तर शहराला पाणी पुरवठा होईल आणि टँकर बंद होतील, अशी माहिती मिळाली. शहरातील गोंड प्लॉट, केजाजी चौक या भागात एप्रिल महिन्यापासून प्रदीप तलमले मित्र परिवार असा फलक लावलेला टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करीत असल्याचे दिसून आले. गांधीनगर भागात गेल्या आठवडाभरापासून नळ आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात टँकर आला तरी एकच ड्रम पाणी दिले जाते. हे अपुरे असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड ओरड होत आहे.सिंदी (मेघे) येथे सहा वॉर्डांकरिता एकच टँकरवर्धा शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतींच्या हद्दीत सहा वॉर्डाला एक टँकर पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे दिवसभरात टँकर कधीही कोणत्याही भागात येऊन धडकतो. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना दिवसभर टँकरची प्रतीक्षा करावी लागते. लोकमतची चमू ज्यावेळी गावात गेली, त्यावेळी वॉर्ड क्र.३ वॉर्ड क्र.२ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बरेचजण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवत असल्याचे दिसून आले. टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.चौथ्या माळ्यावर पाणी हवे, द्या सतराशे!वर्धा शहरातील पाणी पुरवठ्याचा लोकमतने शनिवारी आढावा घेतला. दरम्यान, दुपारी १२.३० वाजता लोकमत चमू शहरातील बाजारपेठेत पोहोचली. यावेळी हिरालाल रामप्रकाश या कापड दुकानाच्या बाजूला पारस आईस फॅक्टरीसमोर कार्यालय असलेल्या एका टँकर मालकाचा टँकर पाणीपुरवठा करताना दिसला. या ठिकाणी लोकमतने चौकशी केली तर पहिल्या ते चौथ्या माळ्यापर्यंत पाणी चढवून द्यायचे असेल तर सतराशे रुपये घेतले जातात. खालीच पाणी उतरवायचे असेल तर १ हजार रुपयाला टँकर दिला जातो. आपल्यालाही हवा असेल तर आमच्या कार्यालयात संपर्क साधा, असे या ट्रॅक्टरच्या चालकाने सांगितले. आमच्याकडे दिवसभर जे लोक टँकर बुक करतात, त्यांना आम्ही पाणीपुरवठा करतो, असे ते म्हणाले.मुस्लिमबहुल भागात पाणी वाटपात पक्षपातवर्धा शहराच्या महादेवपुरा येथील प्रभाग क्र.५ आणि ६ मध्ये नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या भागात पाणीपुरवठा करताना पक्षपात केला जात असल्याची तक्रार नगरपालिकेचे बांधकाम सभापती व नगरसेवक नौशाद शेख यांनी लोकमतकडे केली आहे. या भागात बहुतांश मुस्लिम बांधव रहिवासी आहेत. त्यांचे सध्या रोजे सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. शिवाय त्यांना वेळेत पाणी मिळणेही गरजेचे आहे. असे असताना या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक येऊन ड्रमचे-ड्रम पाणी घेऊन जात आहे. यावर कुणाचाही अंकुश नाही, अशी माहिती नौशाद शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई