शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. या स्विकृत सदस्याचा कोविड चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकोरोनायन : दयालनगरच्या स्विकृत सदस्याला कोरोना संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक दयालनगर येथील रहिवासी तथा वर्धा नगरपालिकेतील स्विकृत सदस्य असलेल्या नगरसेवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा नगरपालिका कार्यालयाला तीन दिवसांकरिता सील लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कोविड बाधिताने स्वातंत्र्यदिनी नगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांची भेट घेतली होती.कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. या स्विकृत सदस्याचा कोविड चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या गंभीर बाबीची माहिती नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांना मिळताच वरिष्ठांच्या सूचनेवरून खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस पालिका कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेत कार्यालय सील करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या काळात पालिका कार्यालय निर्जंतुक केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.कार्यालयीन कामकाजाला ब्रेकवर्धा नगरपालिका कार्यालयात वित्त, कर, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आदी विभागात सुमारे ३७५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे १०० कर्मचारी ऐरवी कार्यालयात थांबून कार्यालयीन कामकाज पूर्णत्त्वास नेतात. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयच तीन दिवसांकरिता सील करण्यात आल्याने कार्यालयीन कामकाजाला सध्या ब्रेक लागला आहे.दोन दिवस केला मुक्त संचारकोविड बाधित स्विकृत सदस्याने १४ आणि १५ आॅगस्टला वर्धा नगरपालिका कार्यालयात येत अनेकांच्या भेटी घेतल्या. शिवाय काही अधिकाºयांसह नगरसेवकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या