पालिका कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:22+5:30
कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. या स्विकृत सदस्याचा कोविड चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.

पालिका कार्यालय सील
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक दयालनगर येथील रहिवासी तथा वर्धा नगरपालिकेतील स्विकृत सदस्य असलेल्या नगरसेवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा नगरपालिका कार्यालयाला तीन दिवसांकरिता सील लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कोविड बाधिताने स्वातंत्र्यदिनी नगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांची भेट घेतली होती.
कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. या स्विकृत सदस्याचा कोविड चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या गंभीर बाबीची माहिती नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांना मिळताच वरिष्ठांच्या सूचनेवरून खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस पालिका कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेत कार्यालय सील करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या काळात पालिका कार्यालय निर्जंतुक केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यालयीन कामकाजाला ब्रेक
वर्धा नगरपालिका कार्यालयात वित्त, कर, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आदी विभागात सुमारे ३७५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे १०० कर्मचारी ऐरवी कार्यालयात थांबून कार्यालयीन कामकाज पूर्णत्त्वास नेतात. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयच तीन दिवसांकरिता सील करण्यात आल्याने कार्यालयीन कामकाजाला सध्या ब्रेक लागला आहे.
दोन दिवस केला मुक्त संचार
कोविड बाधित स्विकृत सदस्याने १४ आणि १५ आॅगस्टला वर्धा नगरपालिका कार्यालयात येत अनेकांच्या भेटी घेतल्या. शिवाय काही अधिकाºयांसह नगरसेवकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.