पालिकेची अग्निशमन यंत्रणा धूळ खात

By Admin | Updated: February 27, 2016 02:21 IST2016-02-27T02:21:37+5:302016-02-27T02:21:37+5:30

देवळी व पुलगाव नगर परिषद क्षेत्रात लागलेल्या आगीवर ताबा मिळविण्याकरिता लाखो रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा पुरविण्यात आली.

The municipal firefighters ate the dust | पालिकेची अग्निशमन यंत्रणा धूळ खात

पालिकेची अग्निशमन यंत्रणा धूळ खात

देवळी-पुलगाव येथील प्रकार : नियोजन शून्यतेमुळे कर्मचाऱ्यांचा अभाव
प्रभाकर शहाकार /हरिदास ढोक पुलगाव/देवळी
देवळी व पुलगाव नगर परिषद क्षेत्रात लागलेल्या आगीवर ताबा मिळविण्याकरिता लाखो रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा पुरविण्यात आली. पण तिचा वापर करण्याकरिता आवश्यक तज्ज्ञ कर्मचारी नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
देवळी नगर परिषदेच्या सेवेत गत एक महिन्यापूर्वीची अग्निशमन बंब रूजू झाला. यासाठी आवश्यक चालक तसेच कर्मचाऱ्यांचा थांगपत्ता नसल्यामुळे ही गाडी शोभेची ठरत आहे. शासनाची नियोजनशून्यता यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
औद्योगिक वसाहत, कापसाची बाजारपेठ तसेच तालुक्याचे ठिकाण म्हणून यासाठी अग्निशमन वाहनाची अनेक वर्षांची मागणी होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक न.प.च्यावतीने ही यंत्रणा उभारण्यात आली. यासाठी २ वर्षांपूर्वी ५० लाखांची वास्तू बांधण्यात आली. त्यानंतर अनेक घडामोडी होवून याठिकाणी ३० लाखांचे अग्निशमन वाहन लोकांच्या सेवेत रूजू झाले. वाहन आल्यामुळे अनेकांना हायसे वाटले; परंतु कर्मचाऱ्यांनी पदभरती नसल्यामुळे मागील महिन्याभरापासून ही व्यवस्था कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The municipal firefighters ate the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.