व्यापक स्वरुप देण्याचा खासदारांचा निर्धार
By Admin | Updated: January 8, 2016 02:41 IST2016-01-08T02:41:48+5:302016-01-08T02:41:48+5:30
‘नो व्हेईकल डे’च्या दुसऱ्या गुरूवारी देवळीत सायकल रॅली काढून भारतमुक्त प्रदूषणाचा जागर करण्यात आला.

व्यापक स्वरुप देण्याचा खासदारांचा निर्धार
देवळी : ‘नो व्हेईकल डे’च्या दुसऱ्या गुरूवारी देवळीत सायकल रॅली काढून भारतमुक्त प्रदूषणाचा जागर करण्यात आला. खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. याप्रसंगी वाढत्या प्रदूषणाबाबत स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ‘लोकमत’च्या ‘नो व्हेईकल डे’ या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून दर गुरूवारला हा दिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार खा. तडस यांनी याप्रसंगी केला. सायकल रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष शोभा तडस, तहसीलदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार बालूताई भागवत व पोलीस निरीक्षक हरिचंद्र परमाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.