आगग्रस्त कुटुंबाची खासदारांनी केली पाहणी
By Admin | Updated: June 19, 2015 00:24 IST2015-06-19T00:24:57+5:302015-06-19T00:24:57+5:30
स्थानिक गौरक्षण फैल येथील कमलाकर खोटोळे यांच्या गोठ्यास ९ जून रोजी रात्री अहाग लागून तीन बैल मृत्यूमुखी पडले होते.

आगग्रस्त कुटुंबाची खासदारांनी केली पाहणी
पुलगाव : स्थानिक गौरक्षण फैल येथील कमलाकर खोटोळे यांच्या गोठ्यास ९ जून रोजी रात्री अहाग लागून तीन बैल मृत्यूमुखी पडले होते. शिवाय सहा गायी होरपळून शेतीच्या साहित्यासह पाच लाखांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या या शेतकरी कुटुंबाची खासदार रामदास तडस यांनी गुरूवारी भेट घेत पाहणी केली. यामुळे सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देण्यात आली.
खासदार तडस यांनी पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ दाखल असलेल्या गुरांची पाहणी केली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडू यांनी काही गाई ६० टक्के जळाल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले. या दवाखान्याची दुरवस्था पाहून खासदार तडस यांनी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकत्याच बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत हा दवाखाना स्थानांतरीत करण्याच्या सूचना दिल्या.
वैद्यकीय अधिकारी डॉ. कडू यांना नुकसानग्रस्त खोटोळे यांच्या उपचारार्थ असलेल्या गुरांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. खासदार तडस यांच्या सोबत नगरसेवक सुनील ब्राह्मणकर, भाजपा शहर अध्यक्ष नितीन बडगे, राजकुमार पनपालिया, गजेंद्र चंदेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)