शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

खासदारांनी स्वीकारले ‘एव्हीन’चे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:43 PM

पीपल फॉर अ‍ॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली.

ठळक मुद्देकरूणाश्रमात बिबट्यावर उपचार सुरू : उपचाराचा सर्व खर्च देण्याचे केले कबुल

ऑनलाईन लोकमतवर्धा : पीपल फॉर अ‍ॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमाची माहिती घेतली. येथे एका जखमी बिबट्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी या संदर्भात विचारणा केली. दरम्यान त्याचे नाव ‘एव्हीन’ असल्याचे कळताच उपचाराचा संपूर्ण खर्च स्वीकारण्याचे कबुल केले.वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वसई कोरा भागात रस्त्यावर घडलेल्या अपघातात डोक्याला मार लागल्यामुले सदर बछड्याचे मागचे पाय लुळे झाले. त्यामुळे वर्धा वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी बाभळे यांच्याद्वारे औषध उपचाराकरीता सदर बिबट्यास करुणाश्रमात दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सदर बछड्यावर शर्थीचे प्रयत्न करून उपचार चालू आहे. या उपचारांमुळे या बछड्याची तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याचे नामकरण ‘एव्हीन’ असे करण्यात आले. पूर्वस्थितीत येण्याकरिता त्याच्यावर दीर्घकाळ उपचार करावे लागणार असल्याची शक्यता पशु वैद्यकीय अधिकाºयांनी वर्तविली आहे. या उपचारांना लागणारा प्रत्यक्ष खर्च व इतर व्यवस्था सध्या संस्था करीत आहे.वर्धेचे खा. रामदास तडस यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी करुणाश्रमात भेट दिली व स्वत: या बिबट्याची पाहणी केली. करूणाश्रम हे वर्धा जिल्ह्याचे भूषण असून या चांगल्या कार्यात माझा सहभाग देऊन बिबट्याच्या आरोग्य सुधारण्या पर्यंतचा संपूर्ण खर्च त्यांनी देऊ केला. एव्हीन नामक बिबट्याच्या बछड्याचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर केले. प्रकल्प स्थळावरून पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष मेनका गांधी यांच्याशी संवाद साधला व संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. भविष्यात वन्यप्राण्यांकरिता पिंजरे उभारणीकरिता खासदार निधीतून मदत करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.एकमेव पशु अनाथ आश्रमपिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे करूणाश्रम हे वर्धा जिल्ह्यातील एकमेव पशु अनाथ आश्रम आहे. आपातकालीन स्थितीत सापडलेल्या प्राण्यांना मायेची सावली देणारे हे पशु अनाथ आश्रम आहे. अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांना ठेवण्यासाठी भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डसह केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरण तसेच महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता प्राप्त आहे. प्राण्यांना विविध सेवा उपलब्ध असलेल्या या पशु आश्रमात नुकतेच काही दिवसांपूर्वी एका सहा महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचे आगमन झाले आहे.