मागण्या पूर्णत्वास येईपर्यंत आंदोलन सुरूच
By Admin | Updated: August 24, 2016 00:32 IST2016-08-24T00:32:07+5:302016-08-24T00:32:07+5:30
वेतनाच्या मागणीकरिता येथील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मंगळवारी सातवा दिवस असून आणखी दोन

मागण्या पूर्णत्वास येईपर्यंत आंदोलन सुरूच
दोघे रुग्णालयात : न.प. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस
आर्वी : वेतनाच्या मागणीकरिता येथील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मंगळवारी सातवा दिवस असून आणखी दोन उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल झाले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचविण्याकरिता सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी उपोषण मंडपात झालेल्या सभेत उपस्थितांनी विचार करताना आमचे आंदोलन राजकीय नसून वेतनाअभावी निर्माण झालेल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याकरिता आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णत्त्वास जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
शिवाजी चौकात नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपात झालेल्या सभेत संघटनेचे कर्मचारी दीपक रोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र पोळ तर प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिका कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अरुण पंड्या, सचिव देवेंद्र गोडबोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संजय अंभोरे यांनी केले तर आभार अरूण पांड्या यांनी मानले. कार्यक्रमाला नगर पालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी दीपक रोडे यांच्या मार्गदर्शनात संजय अंभोरे यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयात तहसीलदार विजय पवार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना मागणीचे निवेदन दिले. या मोर्चात २०० च्यावर कर्मचारी व निवृत्त पेंशनर सहपरिवार सहभागी झाले होते.
नगर परिदेच्या कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठींबा देत शुक्रवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा आहे. शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी व काँग्रेसच्या नगर सेवकांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे व तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल दहाट, नगरसेवक प्रेमराज पालीवाल, शिल्पा चव्हाण, माला निखाडे, गज्जु शिंगाणे, रमजुभाई, मोहम्मद इरफान, महेफुज कुरेशी, रहीम कुरेशी आदी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)