शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! नवजात बाळाला आईने फेकले चक्क उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक उक्त्या किंवा म्हणी समाजात प्रचलित असल्या अथवा सरकारद्वारा स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केल असली तरी आजही समाजात मुलगी ही नकोशीच आहे. मात्र, चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्यावर फेकून दिल्याने मुलीसारखी मुलगा ही नकोसा का झाला असावा, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : ‘माता न तू वैरिणी...’ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना कारंजा तालुक्यातील बोंदरठाणा गावात उघडकीस आली. चक्क आईनेच तासभरापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून पाेबारा केला. ही हृदय पिळवटणारी घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे. ‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक उक्त्या किंवा म्हणी समाजात प्रचलित असल्या अथवा सरकारद्वारा स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केल असली तरी आजही समाजात मुलगी ही नकोशीच आहे. मात्र, चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्यावर फेकून दिल्याने मुलीसारखी मुलगा ही नकोसा का झाला असावा, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होतो आहे. पोटच्या बाळाला फेकून देणं त्या निर्दयी मातेला खरंच काही वाटलं नसेल का, विशेष म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर येताच या बाळाचा संघर्ष सुरु झालेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बोंदरठाणा येथील रहिवासी दयाराम गजाम यांचे घर गावाच्या थोड्या दूर अंतरावर आहे. त्यांची पत्नी पहाटेच पाणी भरण्यासाठी उठली असताना घराच्या मागील परिसरातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी तत्काळ याची माहिती आशासेविका आणि अंगणवाडीसेविकेला दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नवजात बालकाला ताब्यात घेतले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निर्दयी माता-पित्याविरुद्ध कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी दिली.

निर्दयी माता गावातीलच?-    पहाटेच्या सुमारास नवजात बालकाला कचऱ्याच्या उकिरड्यावर फेकून देण्यात आले. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला तर आले नसेल ना, असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये आहे. गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून पोलीस त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. ती निर्दयी माता गावातीलच रहिवासी असेल, असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

नवजात बालकाला केले वर्ध्यात ‘रेफर’ -    बाळ जन्मल्यानंतर त्याला आईच्या दुधाची गरज असते. पण, जन्मदात्रीच निर्दयी निघाल्याने बालकाला दूध मिळाले नसल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला पावडरचे दूध पाजण्यात आले. पण, बाळ दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

अर्भकाचे संपूर्ण शरीर होते मातीने भरलेले

-    गावाबाहेर असलेल्या उकिरड्यावर निर्दयी मातेने फेकून दिल्याने खळबळ उडाली. अर्भकाचे संपूर्ण शरीर मातीने भरलेले होते. नाळ ओली होती. अंगावर एकही कपडा नसल्याने बाळाचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. पोलिसांनी तत्काळ अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. 

 

टॅग्स :new born babyनवजात अर्भक