आईने केले मुलाला पोलिसांच्या स्वाधीन
By Admin | Updated: August 30, 2014 23:57 IST2014-08-30T23:57:53+5:302014-08-30T23:57:53+5:30
मांडवा येथील लॅन्को कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी प्रविण वाघाडे सिद्धार्थनगर, वर्धा याला त्याच्या आईने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीजवळून दोन एलसीडी व

आईने केले मुलाला पोलिसांच्या स्वाधीन
लॅन्को चोरीप्रकरण : दोन एलसीडी व एक फ्रिज जप्त
आकोली : मांडवा येथील लॅन्को कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी प्रविण वाघाडे सिद्धार्थनगर, वर्धा याला त्याच्या आईने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीजवळून दोन एलसीडी व एक फ्रिज जप्त केला आहे.
सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात लॅन्को कंपनीतून सात एलसीडी व चार फ्रिज असा एकूण ७८ हजार रुपयांची चोरी झाली होती. ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार वसंत इंगोले व रवी जुगनाके चोरीचा छडा लावून नऊ आरोपींना अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीकडून चार एलसीडी व दोन फ्रिज जप्त केले होते. तपासात प्रवीण वाघाडे हा आरोपीसुद्धा चोरीस सहभागी असल्याचे पुढे आले होते. त्याचा शोध सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देत होता. इतर आरोपी फरार असल्याने यात नेमके किती आरोपी होते याचा अंदाज अद्यापही पोलिसांनी आलेला नाही.
अशात माहितीत असलेल्या वाघाडे याच्या शोधात पोलीस फिरत असताना फरार आरोपीच्या आईने त्याला आंजी(मोठी) पोलिसांच्या हवाली केले. त्याची पोलीस कोठडी घेवून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली व घरात लपवून ठेवलेल्या दोन एलसीडी व एक फ्रिज पोलिसांना काढून दिला.
यात आतापर्यंत सात एलसीडी पैकी सहा एलसीडी व चार पैकी तीन फ्रिज आरोपींकडून जप्त करण्यात आले असून एक फ्रिज व एलसीडी जप्त होणे शिल्लक आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)