शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:00 AM

सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्राेफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  साेशल मीडियावरून व्यक्त होणाऱ्या प्रत्येकीला हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याने प्रत्येकाला आपल्या आवडीचे फोटो, मते मांडण्याची, लोकांशी जोडण्याची संधी याद्वारे मिळाली आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असतानाच दुसरीकडे मात्र, महिलांना या ‘व्हर्च्युअल’ जगातही सावधगिरीने  वागावे लागत आहे. सोशल मीडियाशी संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सायबर गुन्हेगारांकडून त्यांनाच सर्वाधिक लक्ष्य केल्याचे दिसते. त्यामुळे महिला, मुलींनो तुमच्या डीपीवरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना, हे पाहण्याची गरज असून अधिक सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याकडून करण्यात आले आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी  मिळत आहे. त्यातून मुली, महिलांच्या छायाचित्रांच्या मॉर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून पाच ते सहा तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोचा गैरवापर करून त्रास देणे, बनावट अकाउंट काढून अश्लील पोस्ट टाकणे, इन्स्टाग्रामवरील फोटो चोरून मॉर्फ करत त्रास देणे, सोशल मीडियावर मोबाइल क्रमांक टाकणे, मॅट्रीमोनी साइटवरून फसवणूक, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून त्रास देणे, अशा प्रकारच्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांनी सजग राहण्याची गरज आहे.

मॉर्फिंग म्हणजे काय?- सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्राेफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

ही घ्या उदाहरणे...- सेलू तालुक्यातील एका युवतीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्या महिलेच्या डीपीवरील फोटो चोरून त्यात बदल करून तो बनावट आयडीवर पोस्ट करून अश्लील मेसेज टाकण्यात आला होता. पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.- मॅट्रीमोनी साइटवरून महिलेचा फोटो चोरून सायबर गुन्हेगाराने तो रिपोस्ट करून अश्लील फोटो महिलेच्या मोबाइलवर टाकून बदनामी केली होती. याप्रकरणी महिलेने सायबर पोलिसांत धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. यातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केली.

असा होईल गुन्हा दाखल  मॉर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे केले बदल, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाऊनलोड करून त्यामध्ये बदल करून ती दुसऱ्या वेबसाइटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट २००० अंतर्गत गुन्हा आहे. भांदविच्या कलमाखालीही  गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ३५४, ३५४ ड व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ड अन्वये गुन्हा दाखल केला जातो.

सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनोळखी व्यक्तीला खासगी माहिती देणे महिलांनी टाळावे. सायबर गुन्हेगारांकडून महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड केली जातात. बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी, महिलांनी डीपी ठेवण्याबाबत अधिक सजग राहायला हवे.-प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.

अशी घ्यावी काळजी  

- सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. - प्राेफाइल सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी तपासा. - अनोळखी  व्यक्तीला व्यक्तिगत माहिती पाठवू नका. - सोशल मीडियावर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. - मॅट्रीमोनी साइटवरून ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम