आर्वीत युवक काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: November 15, 2014 01:55 IST2014-11-15T01:55:44+5:302014-11-15T01:55:44+5:30
आर्वी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार अमर काळे यांच्या विधानसभा निलबंन कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरातून युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

आर्वीत युवक काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
आर्वी : आर्वी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार अमर काळे यांच्या विधानसभा निलबंन कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरातून युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच निलंबन मागे घेण्यात यावे, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले.
या निवेदनात, मुंबई येथे राज्यपालांना आपल्या मागण्यासंदर्भात व मतदानाने भाजपाने बहुमत सिद्ध न करता केलेल्या सत्ता स्थापनाचा निषेध नोंदविण्याकरिता गेलेल्या काँग्रेसच्या पाच आमदार निलबंनाची कारवाई करण्यात आली होती. कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचा आरोप करण्यात आला. राज्यातील भाजपा सरकारने सरकार स्थापन करून बहुमत सिद्ध न करता पुरोगामी महाराष्ट्र सरकारात पहिल्यांदाच विश्वास मत आवाजी मतदानाने पारित झाले. वास्तविक विश्वासमत हे मतदान पद्धतीने घेण्याची परंपरा आहे. मात्र भाजपाने आपला पराभव जनतेपासून लपवून ठेवण्यासाठी आवाजी मतदान घेऊन विश्वासमत पारित करून घेतले. हे कृत्य सरकार राज्य घटनेच्या विरोधात असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनात नमुद केले आहे.
या घटनेचा आर्वी युवक काँग्रेसने निषेध करून मूक मोर्चा काढला. यावेळी आर्वी पं.स. सभापती तारा ताडाम, जि.प. सदस्य गजानन गावंडे, न.प. सदस्य प्रा. पंकज वाघमारे, राजू रत्नपारखी, माणिक भादा, युवक काँग्रेसचे सचिन वैद्य, गौरव मोहोड, गजू शिंगणे, बाबाराव खोंडे, गजू गेडे, पंकज नायसे, रज्जाक अली, प्रवीण कडू, सचिन पाचोडे, प्रवीण पोटे, अमोल तेलतुमडे, किशोर सेलोकर, प्रशांत शिरपूरकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)