सांसद आदर्श ग्रामच्या विकासाला आराखड्यानुसार गती

By Admin | Updated: March 24, 2015 01:37 IST2015-03-24T01:37:50+5:302015-03-24T01:37:50+5:30

सांसद आदर्शग्राम योजनेंतर्गत तरोडा येथे गाव विकास आराखडा तयार करण्यात आला असून विविध विभागांच्या

Mood of the MP Model Gram Vikas | सांसद आदर्श ग्रामच्या विकासाला आराखड्यानुसार गती

सांसद आदर्श ग्रामच्या विकासाला आराखड्यानुसार गती

आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : गावात १६६ शौचालयांचे बांधकाम
वर्धा :
सांसद आदर्शग्राम योजनेंतर्गत तरोडा येथे गाव विकास आराखडा तयार करण्यात आला असून विविध विभागांच्या समन्वयाने विकासकामांना प्रारंभ झाला आहे. तरोडा आदर्शगाव म्हणून विकसित करण्यासाठी विभागप्रमुखांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खा. रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत सांसद आदर्श गावातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोडा या गावाचा सर्वांगिन विकास करण्यात येत असून विविध विभागांच्या समन्वयातून आदर्श गावाची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. गावातील बेसलाईन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून राजीव गांधी भवनाचे बांधकाम तसेच अंगणवाडी इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयाची सेवा, सार्वजनिक वाचनालयातर्फे युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावात जाणाऱ्या प्रमुख मार्गाचे डांबरीकरण तसेच सुशोभिकरणांतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिरिष पांडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

जलयुक्तशिवारांतर्गत जलसंधारण व पुनर्भरण
जलयुक्तशिवार कार्यक्रमांतर्गत जलसंधारण व पुनर्भरणाचे कार्यक्रम घेण्यात येऊन शेतीसाठी शाश्वत सिंचनाच्या सुविधा तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
निर्मलग्राम करण्याच्या दृष्टीने १६६ कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यात ६० कुटुंबांने प्रत्यक्ष शौचालय बांधकाम सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील विकासकामे सुरू करण्यात आली असून आठवडी बाजारासाठी ओट्याचे बांधकामही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Mood of the MP Model Gram Vikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.