महिनाभरापासून तहसीलदार रजेवर
By Admin | Updated: June 13, 2014 00:26 IST2014-06-13T00:26:52+5:302014-06-13T00:26:52+5:30
तहसीलचा कारभार सांभाळणारे तहसीलदार प्रकाश महाजन गत एक महिन्यापासून रजेवर आहेत़ त्यांचा कार्र्यभार येथील तीन नायब तहसीलदारांपैकी एकाला देण्याचे सोडून आर्वीच्या तहसीलदारांना

महिनाभरापासून तहसीलदार रजेवर
कामे खोळंबली : आर्वी तहसीलदाराकडे कार्यभार
आष्टी (श़) : तहसीलचा कारभार सांभाळणारे तहसीलदार प्रकाश महाजन गत एक महिन्यापासून रजेवर आहेत़ त्यांचा कार्र्यभार येथील तीन नायब तहसीलदारांपैकी एकाला देण्याचे सोडून आर्वीच्या तहसीलदारांना सोपविण्यात आला आहे़ या प्रकारामुळे आष्टी तहसील कार्यालयातील कामे खोळंबली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़
आर्वी येथील तहसीलदार मनोहर चव्हान यांच्याकडे आधीच उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. आता आष्टी तहसीलदार पदाचा कार्यभार सोपविल्याने एवढा कारभार सांभाळणे शक्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीचे नियोजन, शतकोटी वृक्ष लागवड, मनरेगा, शालेय विद्यार्थ्यांचे विविध दाखले यासह असंख्य कामांचा निपटारा तहसीलदारांना करावा लागणार आहे; पण तहसीलदार प्रकाश महाजन रजेवर गेल्याने संपूर्ण कारभार ठप्प झाला आहे.
अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आर्वीचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे दोन कार्र्यभार असताना त्यांना मुद्दाम आष्टीचा कार्र्यभार दिल्याची ओरड नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ आष्टी तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार आहे़ यामुळे त्यांच्यापैकी सेवाज्येष्ठतेप्रमाणे एखाद्या नायब तहसीलदारास कार्र्यभार सोपविणे गरजेचे होते; पण जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा न करता आर्वीच्या तहसीलारांकडेच कार्यभार सोपविल्याचे दिसते़ तीन पदांचा कार्यभार सांभाळताना नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता कुठेही घेतली गेली नाही. याविरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू भार्गव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली़ यात त्वरित नियमित तहसीलदार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार प्रकाश महाजन महिनाभर खासगी कामाच्या निमित्ताने रजेवर असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात त्यांनी बदली करून घेण्यासाठी सुटी टाकल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे़(प्रतिनिधी)