शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या श्वानाने तोडले चिमुकलीचे लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

तस्मीया शेख आरिफ (९) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. श्वानाच्या हल्ल्यात तब्बल १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. अनेक जण श्वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. असा प्रकार शहरातील सिद्धार्थनगर परिसरात घडला असून मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिक श्वानांच्या दहशतीत होते. आज सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या श्वानाने तब्बल २० जणांवर हल्ला करत त्यांना चावा घेतला.

ठळक मुद्देसिद्धार्थनगर येथील घटना : १५ ते २० जणांना घेतला चावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिसाळलेल्या श्वानाने ९ वर्षीय चिमुकलीवर हल्ला करीत तिचे लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील सिद्धार्थनगर परिसरात घडली. जखमी चिमुकलीला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तस्मीया शेख आरिफ (९) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. श्वानाच्या हल्ल्यात तब्बल १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. अनेक जण श्वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. असा प्रकार शहरातील सिद्धार्थनगर परिसरात घडला असून मागील काही दिवसांपासून या परिसरातील नागरिक श्वानांच्या दहशतीत होते. आज सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या श्वानाने तब्बल २० जणांवर हल्ला करत त्यांना चावा घेतला. यामध्ये तस्मीया आरिफ ही चिमुकली गंभीर जखमी झाली. तस्मीया किराणा दुकानात साहित्य आणण्यास गेली होती. घरी जात असताना तिच्यावर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. तिच्या हाता-पायाचे लचके तोडले. नागरिकांच्या जमावाने तस्मीयाला श्वानाच्या तावडीतून बाहेर काढले. तस्मीयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. इतकेच नव्हेतर याच परिसरातील तब्बल २० जणांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. पिसाळलेल्या श्वानाला मारण्याकरिता परिसरातील नागरिक सकाळपासूनच त्याच्या मागावर होते. हातात लाठ्या-काठ्या घेऊन संतापलेल्या नागरिकांनी अखेर त्या पिसाळलेल्या श्वानाला मारूनच सुटकेचा श्वास घेतला. जखमी तस्मीयावर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. तीला आणखी काही दिवस रूग्णालयात उपचारार्थ ठेवणार असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काहींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. नगर पालिकेने याकडे लक्ष देत पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.नगर पालिका सुस्तचशहरात मागील काही महिन्यांपासून पिसाळलेल्या श्वानांनी उच्छाद घातला असून अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दररोज ४० च्या वर रूग्ण सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता येत आहेत. तर काही खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. पण, नगरपालिका सुस्त असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी त्यांचे दुर्लक्ष होत आहे. श्वानाच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार कां, असा प्रश्न संतप्त नागरिकांतून विचारल्या जात आहे.नागरिकांनीच पार पाडला अंत्यविधीपिसाळलेल्या श्वानाच्या दहशतीत असलेल्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी काही युवकांनी हातात काठ्या घेत श्वानाला ठार मारत सुटकेचा श्वास घेतला इतकेच नव्हेतर मृत श्वानाला जाळून त्याच्यावर अंत्यविधीचे सोपस्कारही पार पाडले.

टॅग्स :Accidentअपघात