युवतीचा विनयभंग तिघांना अटक

By Admin | Updated: July 10, 2015 00:27 IST2015-07-10T00:27:11+5:302015-07-10T00:27:11+5:30

रोठा तलावाजवळ बसून असलेल्या युवतीचा तिघांनी पोलीस असल्याचे सांगत विनयभंग केला. शिवाय मोबाईल हिसकावून घेत तिच्या मित्रास मारहाण केली.

The molestation of the girl has arrested three people | युवतीचा विनयभंग तिघांना अटक

युवतीचा विनयभंग तिघांना अटक

रोठा येथील घटना : पोलीस असल्याची बतावणी
वर्धा : रोठा तलावाजवळ बसून असलेल्या युवतीचा तिघांनी पोलीस असल्याचे सांगत विनयभंग केला. शिवाय मोबाईल हिसकावून घेत तिच्या मित्रास मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तीन युवकांना अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री केली.
एक युवती तिच्या मित्रासह रोठा तलावावर बसून होती. दरम्यान, अज्ञात तीन इसमांनी पोलीस असल्याचे तिचा विनयभंग केला. तिच्या मित्रास मारहाण करून ३६ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. शिवाय अश्लील शिवीगाळ केली. याबाबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सदर गुन्ह्यात आर्वी नाका परिसरातील धोपटे याचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याचा शोध घेतला असता भूषण धोपटे हाती लागला. चौकशीत गुन्ह्याची कबुली देत संदीप वसंतराव भोसले (३८) रा. साईनगर, भूषण रमेश धोपटे (२५) रा. आर्वी नाका व आशिष दशरथ हजारे (३४) रा. गांधीनगर यांची नावे सांगितली. यावरून पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले. प्रकरणाचा पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे यांच्या मार्गदर्शनात एस.बी. कडू, मनोज नांदुरकर, किशोर आप्तुरकर, खुशाल राठोड, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टाकसाळे, अक्षय राऊत, अनुप राऊत, चंद्रकांत जिवतोडे, हितेंद्र चव्हाण यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The molestation of the girl has arrested three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.