परवानगी न घेताच उभारले मोबाईल टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:22+5:30
शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अर्शी मलीक आणि प्रशांत माहुरे यांनी केली आहे.

परवानगी न घेताच उभारले मोबाईल टॉवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महादेवपुरा येथील शब्बीर अली अब्बास अली यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अर्शी मलीक आणि प्रशांत माहुरे यांनी केली आहे.
मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या रेडीऐशनमुळे नागरिकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. महादेवपुरा परिसरातील नागरिकांनी यापूर्वी न.प.चे मुख्याधिकारी यांना तक्रार दिली होती.
त्यांनी हुसेन अली अब्बास अली, हमीद अली हातीम अली, शब्बीर अली अब्बास अली यांच्यावर गुन्हे दाखल करून टॉवरचे काम बंद पाडले होते. परंतु, त्यांनी कायद्याला न जुमानता मनमर्जीने विनापरवानगी पुन्हा २६ मे रोजी मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू केले आहे. नागरिकांनी पुन्हा याची न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून हुसेन अली अब्बास अली, हमीद अली हातीम अली, शब्बीर अली अब्बास अली, नीलेश महानगडे, स्वप्नील काळमेघे यांच्यावर कारवाई करून टॉवरचे काम बंद करावे, अशी मागणी अर्शी मलीक, प्रशांत माहुरे यांनी केली.