ब्लेडचा धाक दाखवून मोबाईल चोरणारा जाळ्यात

By Admin | Updated: February 12, 2017 01:00 IST2017-02-12T01:00:47+5:302017-02-12T01:00:47+5:30

डोळ्यात मिरची पावडर फेकून ब्लेडने हल्ला चढवून मोबाईल हिसकावणाऱ्या अक्षय नेवारे याला पोलिसांनी तब्बल ४१ दिवसानंतर अटक केली.

Mobile thief netting a blade | ब्लेडचा धाक दाखवून मोबाईल चोरणारा जाळ्यात

ब्लेडचा धाक दाखवून मोबाईल चोरणारा जाळ्यात

४१ दिवसानंतर कारवाई: चोरट्याकडून मोबाईल जप्त
वर्धा : डोळ्यात मिरची पावडर फेकून ब्लेडने हल्ला चढवून मोबाईल हिसकावणाऱ्या अक्षय नेवारे याला पोलिसांनी तब्बल ४१ दिवसानंतर अटक केली. त्याच्याकडून हिसकावून नेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जनतानगरातील पंकज नागतोडे (२५) याने २८ डिसेंबर रोजी आर्वी पोलिसात दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान गांधी विद्यालयाच्या मैदानावर थांबून दुचाकीवर बसून पंकज नागतोडे हा मोबाईलद्वारे बोलत होता. दरम्यान एका अज्ञात इसमाने त्याच्या पाठीमागून येत त्याच्या दोन्ही डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच नंतर अंगावर ब्लेडने वार करण्याची धमकी देत पंकज नागतोडे यांच्या जवळील मोबाईल हिसकावून नेला होता. या बाबतची तोंडी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू करीत आर्वीतच राहणाऱ्या अक्षय नेवारे याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रवीण जुवारे, राजेश राठोड, गजानन लामसे, गजानन वडनेरकर, विशाल मडावी यांनी केली. चोरट्याजवळून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याकडून आणखी मोबाईल जप्त होण्याचा संशय पोलिसांना आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: Mobile thief netting a blade