शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

आमदारांचा सोशल मीडियावरही दांडगा जनसंपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

हल्ली सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरताना दिसून येत आहे. कमी वेळात जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याकरिता फेसबूक, इन्स्टाग्राम व ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. याचाच फायदा वर्ध्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील आमदार व खासदारही करून घेत आहेत. आमदार व खासदारां यांच्या वैयक्तिक अकाउंटसोबतच पेजही तयार करण्यात आले आहे. ते नियमित अपडेट केले जात असल्याने त्यांचे फॉलोअर्सही वाढत आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकांपर्यंत पोहोचून लोक कल्याणाकरिता लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी सदैव धडपडणाऱ्या व्यक्तीलाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जाते. निवडून आल्यानंतरही  आमदारांना जनसंपर्क कायम ठेवावा लागतो. आता सोशल मीडियामुळे लोकप्रतिनिधींना जनसंपर्काचे नवे साधन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आमदारांचा आता थेट भेटीसोबतच सोशल मीडियावरही दांडगा जनसंपर्क असल्याचे दिसून येत आहे.हल्ली सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरताना दिसून येत आहे. कमी वेळात जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याकरिता फेसबूक, इन्स्टाग्राम व ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. याचाच फायदा वर्ध्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील आमदार व खासदारही करून घेत आहेत. आमदार व खासदारां यांच्या वैयक्तिक अकाउंटसोबतच पेजही तयार करण्यात आले आहे. ते नियमित अपडेट केले जात असल्याने त्यांचे फॉलोअर्सही वाढत आहे. सोशल मीडियावरील आमदार व खासदारांच्या नावे असलेल्या एका अकाउंटवरील माहितीनुसार ही आकडेवारी घेण्यात आली आहे. या लोकप्रतिनिधींचे सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असले तरीही त्यांचा जनमानसांशी थेट संपर्क असल्याने मोठा चाहतावर्ग आहे, हेही विसरून चालणार नाही.

खासदारांचे ट्विटर अकाऊंट सुपर फास्ट...nलोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे खासदार रामदास तडसही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांचेही फेसबूक पेज, फेसबूक अकाउंटसोबतच ट्विटर अकाउंटही असून नियमित अपडेट केले जात आहे. एका फेसबूक अकाउंटवरील माहितीनुसार त्यांचे ४ हजार ९२२ फ्रेंड असून, १५ हजार ९५४ फॉलोअर्स आहेत; तर ट्विटर अकाउंटवर तब्बल ९ हजार ६३८ फॉलोअर्स आहेत. चारही आमदारांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची बेरीज केली तरीही खासदारांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचू शकत नाही.

ट्विटरवर आमदार केचे यांची आघाडीnचारही आमदारांचे फेसबूकप्रमाणेच ट्विटर अकाउंट असून, त्यावरही ते सक्रिय आहेत. मात्र, ट्विटरपेक्षा फेसबूकचा वापर जास्त केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानाही आमदार दादाराव केचे यांचे चारही आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक १ हजार १२० फॉलोअर्स आहेत; तर ट्विटर अकाउंटवर सर्वांत कमी फॉलोअर्स आमदार रणजित कांबळे यांचे असल्याचे दिसून आले आहे. आमदार कांबळे यांचे केवळ ९३ फॉलोअर्स आहेत.

कोरोनाकाळात मिळाला मोठा आधार...कोरोनाकाळात जमावबंदी करण्यात आली होती. कोरोनाचे नियम पाळून गरजवंतांना मदत करण्यासाठीही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. या काळात प्रत्यक्ष बैठकीला परवानगी नसल्याने सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून माहिती देणे, मदतकार्य करणे, मतदार संघातील कोरोनाची स्थिती जाणून घेणे यासाठी लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियाचा पूर्ण वापर करून घेतला.

फेसबूकवर आमदार कुणावार जोमातnजिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील आमदार फेसबूकच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यामध्ये त्यांचे फेसबूक फ्रेंड आणि फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. आमदार समीर कुणावार यांच्या फेसबूकवरील एका अकाउंटवरील माहितीनुसार त्यांचे तब्बल ४३ हजार ४९२ फॉलोअर्स आहेत, ही इतर आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक संख्या आहे; तर सर्वांत कमी १ हजार ४५८ फाॅलोअर्स आमदार दादाराव केचे यांच्या फेसबूक अकाउंटवर असल्याचे दिसून आले.

  फेसबूक अकाउंट अनेक, चालवतात एकच! 

सोशल मीडियावरही सक्रिय राहण्यासाठी चार आमदार व खासदाराकडून फेसबूकचा वापर केला जात आहे. फेसबूकवर एकाच्याच नावाचे एकापेक्षा अधिक अकाउंट दिसून येत आहे. काहींच्या नावे फेसबूक पेजही असून, यापैकी केवळ एकच अकाउंट आमदार, खासदार किंवा त्यांचे निकटवर्ती नियमित अपडेट करीत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसSocial Mediaसोशल मीडिया