शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

बेपत्ता नवरदेवाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:00 AM

दोन विद्युत मोटारी लावून विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून काढले. मात्र, विष्णुचा विहिरीत व शेतात इतरत्र कुठेही शोध लागला नाही किंवा मृतदेह आढळला नाही. बुधवार १५ जानेवारीला ज्या जागेवर १० वेळा जावून आले. त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने विष्णूच्या मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

ठळक मुद्देदुर्गंधीमुळे उजेडात आली घटना : शेतात जातो म्हणून निघाला होता घराबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कसाहुर/आष्टी (शहीद) : साहूर येथील विष्णू भगवंत लाड यांचे ८ जानेवारीला लग्न ठरले. लग्नपत्रिकांचे वितरण झाले. अवघ्या दोन दिवसांनी लग्न असताना ६ जानेवारीला शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या विष्णूचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विष्णूची हत्याच करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.बेपत्ता असलेल्या विष्णूचा शोध घेतल्या जात असताना त्याच्याच मालकीच्या शेतात विष्णूचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कापूस वेचणीचे काम सुरू असताना शेतमजूर महिलांना दुर्गंधी बाबतची माहिती इतरांना दिली. अशातच शेतातील मोहन भोरे व इतरांनी बारकाईने पाहणी केली असता मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह कुणाचा याबाबतची चर्चा सुमारे १ तास सुरू असताना विष्णूच्या वडील भगवंत लाड यांना पाचारण करून मृतकाची ओळख पटविण्यात आली. विष्णूची आत्महत्या नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा आरोप विष्णूच्या आई-वडिलांसह ग्रामस्थांकडून केला जात आहे. ज्या विहिरीजवळ विष्णूचा मृतदेह आढळून आला. त्या जागेवर व संपूर्ण शेतात घरच्यामंडळीसह गावातील ५० ते १०० लोकांनी शेतातील पºहाटीची एक एक ओळ शोधून काढली. एवढेच नव्हे तर दोन विद्युत मोटारी लावून विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून काढले. मात्र, विष्णुचा विहिरीत व शेतात इतरत्र कुठेही शोध लागला नाही किंवा मृतदेह आढळला नाही.बुधवार १५ जानेवारीला ज्या जागेवर १० वेळा जावून आले. त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने विष्णूच्या मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी होती. मनमिसळू स्वभावाचा विष्णू सर्वांशी सौजन्याने राहत होता. सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटेनची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Murderखून