हिंगणघाट पालिकेच्या विषय समित्यांवर ‘मिश्र’पक्षांचा कब्जा
By Admin | Updated: December 23, 2014 23:09 IST2014-12-23T23:09:00+5:302014-12-23T23:09:00+5:30
नगर पालिकेच्या विषय समित्यांची मंगळवारी निवडणूक अविरोध झाली असली तरी यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मात्र सत्ताधारी भाजपला एकही समिती आपल्या

हिंगणघाट पालिकेच्या विषय समित्यांवर ‘मिश्र’पक्षांचा कब्जा
हिंगणघाट : नगर पालिकेच्या विषय समित्यांची मंगळवारी निवडणूक अविरोध झाली असली तरी यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मात्र सत्ताधारी भाजपला एकही समिती आपल्या ताब्यात ठेवता न आल्याने मोठा हादरा बसला आहे.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे अॅड. सुधीर कोठारी, काँग्रेसचे राजीव अवचट व शिवसेनेचे दशरथ ठाकरे यांची अविरोध निवड झाली. पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी लता थुल(अपक्ष), महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी कोळीळा कुळमेथे (काँग्रेस), आरोग्य समिंती सभापतीपदी बालाजी गहलोत(राकाँ), शिक्षण समिती सभापतीपदी अनिल भोंगाडे (मनसे), तर बांधकाम समिती सभापतीपदी कुणावार आघाडीचे विठ्ठल गुळघाणे यांची वर्णी लागली.
पालिकेत भाजपने तीन सदस्यांच्या जोरावर शिवसेना ६, अपक्ष तीन आणि राष्ट्रवादीच्या ६ बंडखोर सदस्यांच्या बळावर सत्ता काबीज केली होती. मात्र विषय समित्यांमध्ये भाजपला यश मिळविता आले नाही. भाजपला एकही समिती मिळविता आली नाही, हे विशेष. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)