शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आदिवासी शिष्यवृत्ती व घरकूल योजनेत गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:08 PM

आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प अधिकारी शुभांगी सपकाळ, आदिवासी विकास विभाग (नागपूर) व जि.प. शिक्षण विभागाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिक्षण हक्क परिषदेचा लढा : वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प अधिकारी शुभांगी सपकाळ, आदिवासी विकास विभाग (नागपूर) व जि.प. शिक्षण विभागाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणात सबळ पुरावे मिळाल्यास संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करू, असे आश्वासन ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिल्याचे परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे. या योजनांमधील भ्रष्टाचाराविषयी वारंवार निवेदन देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष नितीन मडावी यांच्यासमोर सर्व पुराव्यांसह प्रकरणे ठेवल्यानंतरही गैरव्यवहार करणाऱ्यांविरूद्ध कारवाई झाली आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा व आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी दीड तास चर्चा होऊनही या प्रकरणात कुठलाच मार्ग निघाला नाही. परिणामी, शेवटचा पर्याय म्हणून संघटनेने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे पत्रकात म्हटले आहे.संघटनेच्या वतीने २३ मे २०१७ ते २६ जून २०१७ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात संयोजक मारोती उईके अत्यवस्थ झाल्याने त्यांना सेवाग्राम रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल २०१७ ला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य माया इवनाथे यांच्या समक्ष हा प्रश्न मांडण्यात आला होता. परंतु, त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे अखेरीस अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल यांच्याकडेही तक्रार सादर करण्यात आली आहे.