आज ठरतील मिनी मंत्रालयाचे शिलेदार

By Admin | Updated: February 23, 2017 00:46 IST2017-02-23T00:46:25+5:302017-02-23T00:46:25+5:30

जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले.

Minor Ministry Shiller today will decide | आज ठरतील मिनी मंत्रालयाचे शिलेदार

आज ठरतील मिनी मंत्रालयाचे शिलेदार

यंत्रणा सज्ज : ८४७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
वर्धा : जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले. तेव्हापासून सर्वांनाच निकालाची उत्सूकता लागली होती. ही उत्सूकता काही तास ताणली जाणार आहे. गुरूवारी मतमोजणी होत असून मिनी मंत्रालयाचा शिलेदार कोण, हे ठरणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून कर्मचारीही तैनात केले आहेत. जिल्ह्यात आठही तालुक्यात सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ३३९ मतदारांची नोंद आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १६ फेबु्रवारी रोजी ४ लाख ९२ हजार २९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यात २ लाख ६३ हजार ७६७ पुरूष तर २ लाख २८ हजार ५२८ स्त्री मतदारांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील दोन गट व चार गणासाठी मतदान झाले. यात एकूण मतदार २७ हजार १९९ होते. यापैकी १९ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. यात १० हजार ३४५ पुरूष तर ८ हजार ९१६ महिला मतदारांचा समावेश होता. ५२ जि.प. गट व १०४ पं.स. गणाकरिता ८४७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरूवारी होणार आहे.
मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. १३० टेबलवरून मतमोजणी केली जाणार असून सुमारे ९०० अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आहेत. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आष्टी, कारंजा, समुद्रपूर, देवळी आणि हिंगणघाट येथील मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. आर्वी येथील मतमोजणी गांधी विद्यालयात, सेलू येथे दिपचंद चौधरी विद्यालय तर वर्धा येथील मतमोजणी जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात येणार आहे. यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
मतमोजणी शांततेत पार पडावी, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील आठही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक, ४३५ पोलीस कर्मचारी, एसआरपीची एक कंपनी आणि राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
१३० टेबलवरून मतमोजणी
मतमोजणीसाठी वर्धेत क्रीडा संकुलावर व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्धेत २८ टेबलवर मोजणी होणार असून १ ते १४ टेबलवर जि.प. गटांची तर १५ ते २८ टेबलवर पं.स. गणाची मोजणी होईल. सेलू येथे १८ टेबल, देवळी, समुद्रपूर व कारंजा येथे प्रत्येकी १२ टेबल, हिंगणघाट येथे २१, आष्टी ९ तर आर्वी येथे १८ टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे.

Web Title: Minor Ministry Shiller today will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.