मिनी मंत्रालयाचा वाढीव अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 26, 2015 01:45 IST2015-03-26T01:45:20+5:302015-03-26T01:45:20+5:30
अर्थ व बांधकाम समिती सभापती तथा उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय सभेत २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा १४ कोटी ७९ लाख ५ हजार १३४ रुपयांचे ...

मिनी मंत्रालयाचा वाढीव अर्थसंकल्प
वर्धा : अर्थ व बांधकाम समिती सभापती तथा उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय सभेत २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा १४ कोटी ७९ लाख ५ हजार १३४ रुपयांचे मिनी मंत्रालयाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले. २०१४-१५ च्या अंदाजपत्रकापेक्षा एक कोटी ६३ लाख १५ हजार ७३४ रुपयांची वाढीव तरतूद असलेला हा अर्थ संकल्प सभागृहाने एकमताने मंजूर केला.
जिल्हा परिषद सभासदांना त्यांच्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत विशेष वाढ करण्यात आलेली आहे. विविध लेखाशिर्षा अंतर्गत असलेल्या जुन्या तरतुदीपेक्षा यंदा केलेली भरीव वाढ या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्ये आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण अंतर्गत २५ लाख ९७ हजार ९०० रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभाग अंतर्गत ३० लाख २९ हजार ६०० रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी २३ लाख १३ हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा व कल्याण अंतर्गत ९३ लाख ४५ हजार २३४ रुपयांची वाढीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण अंतर्गत १९ लाख ४९ हजार ८०० रुपयांची वाढीव तरतुद करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कटपालन आणि इंधन व वैरण अंतर्गत २१ लाख ६६ हजार २०० रुपयांवरुन तब्बल २१ लाख ९९ हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. इतर कृषी कार्यक्रमाअंतर्गत ७ लाख ९८ हजार ५०० रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आले आहे.
परिवहनावरील भांडवली खर्च अंतर्गत २२ लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य लेखाशिर्षाअंतर्गत ७ लाख ५० हजार ८०० रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे.
पंचायत राज कार्यक्रमांतर्गत ४३ लाख ९९ हजार ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. लहान पाटबंधारे अंतर्गत २२ लाख ६७ हजार ९०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. शिक्षणावरील भांडवली खर्चात २४ लाखांची, तर १३ वने अंतर्गत वनविभागातील रस्ते व मोऱ्या बांधणे व दुरुस्तीकरिता १४ लाखांची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.
ग्रामीण विकासाचा दृष्टीकोण समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची माहिती अर्थ समिती सभापती कांबळे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)