उभ्या ट्रकवर मिनी ट्रक आदळला
By Admin | Updated: May 18, 2015 01:58 IST2015-05-18T01:58:09+5:302015-05-18T01:58:09+5:30
अमरावती नागपूर महामार्ग क्रमांक ६ वर बोरी फाट्याजवळ उभ्या ट्रकवर मिनी ट्रक आदळला.

उभ्या ट्रकवर मिनी ट्रक आदळला
कारंजा (घाडगे): अमरावती नागपूर महामार्ग क्रमांक ६ वर बोरी फाट्याजवळ उभ्या ट्रकवर मिनी ट्रक आदळला. यात चालक व वाहक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले आहे. जखमीचे नाव पिंटू केशवराव चव्हाण व रितेश धनराज देशमुख असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच.४० वाय-१७१३ हा मिनी ट्रक अमरावती येथून नागपूरकडे जात होता. दरम्यान सदर ट्रक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एम.एच.४० वाय-९००० या ट्रकवर आदळला. यात मिनी ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात चालक पिंटु केशव चव्हाण (३०) व वाहक रितेश धनराज देशमुख (२७) दोघेही राहणार विजयनगर, बालाघाटरोड, गोंदिया येथील असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)