वाहनासह लाखोंचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: January 18, 2017 00:44 IST2017-01-18T00:44:50+5:302017-01-18T00:44:50+5:30
मध्यप्रदेशातील दारू जिल्ह्यात विकण्याकरिता आणत असलेल्यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेते.

वाहनासह लाखोंचा दारूसाठा जप्त
दोघांना अटक : मध्यप्रदेशातून आणत होते दारू
कारंजा (घा.) : मध्यप्रदेशातील दारू जिल्ह्यात विकण्याकरिता आणत असलेल्यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेते. सदर प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा व कार जप्त केला आहे. ही कारवाई कारंजा पोलिसांनी सोमवारी रात्री केली.
सदर कारवाईत निव्वळ ३ लाख ५४ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान खान रहमानखान (२६) रा. आनंदनगर व शेख इम्राण शेख सत्तार (२५) रा. महादेवपुरा असे अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मध्यप्रदेशातुन स्वस्त दारु आणून ती वर्धेत विकण्याचा प्रकार जुनाच आहे. ही दारू वर्धेत नागपूर किंवा कारंजा-काटोल मार्गे आणल्या जाते. असाच मध्यप्रदेशातील दारूसाठा सोमवारी रात्री कारंजा मार्गे वर्धेत येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एम. एच. ३२, ५५७७ क्रमांकाचे वाहन नारा-आजनादेवी पुलावर अडवून तपासले असता वाहनात ३ लाख ५४ हजाराची ३७ पेट्या विदेशी दारू व २४ हजाराची रोख मिळून आली. पोलिसांनी एकूण १४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणेदार विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राठोड, कोरडे, निरज लोही, गुड्डु थुल, अमोल नगराळे, उमेश खामलकर, कैलास माहुरकर यांनी केली.(शहर प्रतिनिधी)