पेट्रोलची टाकी फुटल्याने लावली दुधाची किटली
By Admin | Updated: October 7, 2015 00:43 IST2015-10-07T00:43:10+5:302015-10-07T00:43:10+5:30
सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखिची आहे, याची सर्वांनाच माहिती आहे.

पेट्रोलची टाकी फुटल्याने लावली दुधाची किटली
आर्थिक अडचणीवर अपंग शेतकऱ्याची मात
प्रफुल्ल लुंगे सेलू
सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखिची आहे, याची सर्वांनाच माहिती आहे. अशात कोणत्याही कामाकरिता रक्कम खर्च करणे त्याला सहज परवडणारे नाही. याचेचे उदाहरण सेलू येथील एक अपंग शेतकरी ठरत आहे. या शेतकऱ्याच्या दुचाकीची पेट्रोलची टंकी खराब झाली. ती दुरूस्त करणे शक्य नसल्याने त्याने थेट पेट्रोल टँक म्हणून थेट दुधाची किटली लावली आहे. त्याची ही शक्कल गावात कौतुकाचा विषय ठरत आहे.
येथील अपंग शेतकरी शालिक चाफले यांच्या वाहनाची पेट्रोल टाकी लिक झाली. नवीन पेट्रोल टाकी महागडी असल्यामुळे सद्यस्थितीत ती लावणे शक्य नाही. यावर त्यांनी नामी उपाय शोधून काढला. तो म्हणजे दुधाची किटली पेट्रोल टाकीच्या जागेवर बांधून त्यातून पेट्रोलचा पुरवठा इंजीनला करून आपला प्रवास सुरू केला आहे. शालिक अपंग असल्याने त्याने दुरचा प्रवास पायी वा सायकलने करणे शक्य नाही. पायी चालतानाही त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे त्याला दुचाकी गरजेची आहे. शालिकची सारी मदारच या दुचाकीवर अवलबूंन आहे. अशा स्थितीत त्याच्या वाहनाची टाकी लिक होवून पेट्रोल वाया जावू लागले. नवीन टाकी लावण्याशिवाय पर्याय नव्हता. सध्याच्या स्थितीत नवी टाकी टाकणे शक्य नाही. ती खर्चाची बाब म्हणून त्यांनी यावर नामी उपाय शोधून काढला व दुधाच्या जुन्या किटलीचा उपयोग पेट्रोल टाकी म्हणून करून घेतला. तीला कॉक लावून पेट्रोलचा पुरवठा इंजिनकडे देण्यात आला. रस्त्याने धावताना अनेक जण या लुनाकडे कुतुहलाने बघत असल्याचे दिसून येते.