रॅलीतून दिला सामाजिक एकतेचा संदेश
By Admin | Updated: January 10, 2016 02:41 IST2016-01-10T02:41:47+5:302016-01-10T02:41:47+5:30
येथील पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी पोलीस दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम,

रॅलीतून दिला सामाजिक एकतेचा संदेश
गिरड : येथील पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी पोलीस दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या कार्याची माहिती आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच रॅलीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेशहे देण्यात आला.
यामध्ये सर्र्व प्रथम शांतता कमेटी, पोलीस कर्मचारी, तंटामुक्त समिती निर्मल ग्राम स्वच्छता व आरोग्य समिती, विकास विद्यालय, कन्या विद्यालय, जि. प. शाळेतील विद्यार्थी यांनी पोलीस स्टेशनमधून जनप्रबोधन फलक हातात घेऊन मुख्य मार्गाने रॅली काढली. यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार सुरेश थोटे तर प्रमुख अतिथी शांतता कमेटी अध्यक्ष रहिम शेख, पं. स. सदस्य मुरलीधर पर्बत, फकीरा खडसे, अब्दुल कदीर, सरपंच चंदा कांबळे, उपसरपंच विजय तडस, प्रभाकर चामचोर, प्रकाश गोडबोले मंचावर उपस्थित होते. यावेळी हेमचंद्र बावणे, रामदास दराडे, संजय लाडे, विशाल ढेकले, गजानन घोडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वॉकी टॉकी हातकडी, बंदूक, काठी, ढाल, स्टेशन डायरी, बंदीगृह, मालखाना या विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सर्व शस्त्रे हाताळत पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार समजून घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाजी शंभरकर यांनी केले. संचालन गजानन घोडे तर आभार इंद्रपाल आटे यांनी मानले. शरद इंगोले, रहीम शेख, धम्मा लाखे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)