शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

कौटुंबिक संघर्षात पुरुषही होतात पीडित; तक्रारींचा ओघ वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 18:44 IST

'भरोसा सेल'कडे तीन महिन्यात ३४ तक्रारी : गेल्या वर्षात अनेकांचा झाला समझोता, समुपदेशातून होतो निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणाऱ्या कौटुंबीक वादात महिलांप्रमाणेच भरडल्या जाणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मानसिक छळ, खोट्या आरोपांची भीती आणि नात्यांतील तडजोडीत त्यांचा सर्वाधिक बळी जाताना दिसत आहे.

पोलिसांच्या 'भरोसा सेल'कडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये आता पुरुषांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन महिन्यात कौटुंबीक त्रासाने ग्रासलेल्या ३४ पुरुषांनी त्याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.

मागील वर्षी २०२४मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे ५०८ तक्रारी दाखल झाल्या. यात पुरुषांच्या तक्रारींचीही नोंद होती. त्या सर्व प्रकरणांत भरोसा सेलने समुपदेशनातून मार्ग काढत समझोता करून दिला. आकडेवारीवर नजर टाकली, तर दर पाच तक्रारींपैकी एक तक्रार पुरुषाने केली असल्याचे आढळून येते. घरगुती वाद आणि मानसिक त्रास याबाबतीत महिलांचे प्रमाण जास्त असले, तरी पुरुषांनाही अन्याय सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

अनेक प्रकरणं न्यायालयात, घटस्फोटाचे प्रमाणही वाढलेत...विशेष म्हणजे चालू वर्षाच्या (२०२५) पहिल्या तीन महिन्यात भरोसा सेलकडे एकूण २५८ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातही ३४ पुरुषांच्या तक्रारींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ तीन महिन्यांत पुरुषांकडून तक्रारी दाखल होण्याचा आकडा लक्षणीय आहे आणि तो सातत्याने वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. त्यांच्याकडून घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांत अनेकांचे घटस्फोटही झाले आहेत. मात्र, तरीही भरोसा सेलकडून संसार जुळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहेत.

१२ प्रकरणांत पोलिसांनी समुपदेशनातून केला समझोताभरोसा सेलकडे दाखल झालेल्या पुरुषांच्या ३४ तक्रारींपैकी १२ तक्रारींचा समुपदेशनाने समझोता करण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणांत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भरोसा सेलकडून मिळाली.

पुरुषही ठोठावताहेत 'भरोसा'चा दरवाजाविविध प्रकरणांत पुरुषांना घरगुती हिंसाचार, खोटे आरोप, मानसिक त्रास यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. फारच बिकट परिस्थितीत पोहचल्यावर ते 'भरोसा सेल'चा दरवाजा ठोठावत आहेत. एकूणच महिलांसोबतच पुरुषांनाही समुपदेशन आणि न्याय मिळवून देण्यासाठी भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाwardha-acवर्धा