भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आजनसऱ्यात भाविकांचा मेळा

By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30

विदर्भाची पंढरी, संत भोजाजी महाराजांचे जन्मगाव व पुरणपोळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथे १९५५ सालापासून संत भोजाजी महाराज यांची पुण्यतिथी...

A meeting of devotees in Bhajanji Maharaj's dusk | भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आजनसऱ्यात भाविकांचा मेळा

भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आजनसऱ्यात भाविकांचा मेळा

अल्लीपूर : विदर्भाची पंढरी, संत भोजाजी महाराजांचे जन्मगाव व पुरणपोळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथे १९५५ सालापासून संत भोजाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते़ यात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जात असून भाविकांच्या स्वागतासाठी आजनसरा नगरी सज्ज झाली आहे़
विदर्भात सर्वदूर परिचित असलेल्या संत भोजाजी महाराज देवस्थानात भाविक दर्शनार्थ येतात़ येथे प्रत्येक आठवड्यात बुधवारी आणि रविवारी पुरणपोळीचा प्रसाद केला जातो़ यासाठी शेकडो भाविक स्वयंपाक घेऊन येतात़ भाविकांच्या सोयीसाठी आजनसरा देवस्थान परिसरात स्वयंपाकाच्या शेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे़ गुरूवारपासून सुरू होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सध्या आजनसरा नगरी सजली आहे़
या सप्ताहात आयोजित दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता विदर्भातील भजनी मंडळे दाखल झाली आहेत़ यामुळे सध्या आजनसरा येथे भक्तांचा मळा फुलल्याचेच चित्र आहे़(वार्ताहर)

Web Title: A meeting of devotees in Bhajanji Maharaj's dusk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.