यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळा वाऱ्यावर
By Admin | Updated: April 10, 2016 02:22 IST2016-04-10T02:22:06+5:302016-04-10T02:22:06+5:30
पाटबंधारे विभागाकरिता साहित्य बनविण्याकरिता बोरगाव (मेघे) येथे उपविभागीय यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेचे कार्यालय आहे.

यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळा वाऱ्यावर
उपअभियंता सतत गैरहजर : लाखोंचे साहित्य उघड्यावर
वर्धा : पाटबंधारे विभागाकरिता साहित्य बनविण्याकरिता बोरगाव (मेघे) येथे उपविभागीय यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेचे कार्यालय आहे. सामान्य नागरिकांचा या कर्मशाळेशी विशेष संंपर्क येत नाही. याचाच लाभ उचलत येथील अधिकारी कार्यालयात राहत नसल्याचे समोर आले आहे. येथील उपअभियंत्याकडे नागपूर येथील प्रभार असल्याने ते वर्धेच्या कार्यालयात क्वचितच येत असल्याचे समोर आले आहे.
शहराच्या बाहेर बोरगाव येथून चितोडा मार्गावर असल्याने या कार्यालयाकडे कोणाचेही लक्ष नाही. यामुळे येथे अधिकारी येतात अथवा नाही याची माहिती घेण्याकरिता कोणी वरिष्ठ अधिकारी येथे येत नाही. याचाच लाभ उचलत या कार्यालयातील अधिकारी येथे हजर राहत नसल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोमवारी मुख्यालयी राहाने सक्तीचे केले होते. असे असले तरी या निर्णयाला येथील अधिकारी डावलत असल्याचे चित्र आहे. अधिकारी गैरहजर असल्याने येथील कर्मचारी झाडाच्या सावलीत बसून असतात. या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांबाबत विचारणा केली असता कर्मचारी काही सांगण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)