मतविभाजनाने बिघडले दिग्गजांचे गणित
By Admin | Updated: October 19, 2014 23:58 IST2014-10-19T23:58:27+5:302014-10-19T23:58:27+5:30
वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू

मतविभाजनाने बिघडले दिग्गजांचे गणित
वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू तालुक्यातील मतांवरच होता. त्यांनी घेतलेल्या मतांमध्ये बहुतांश मते सेलू तालुक्यातील आहे. याचा फटका शेखर शेंडे यांना बसला.
आर्वीत अमर काळे हे केवळ ३ हजार १४३ मतांनी विजयी झाले. येथे भाजपाचे दादाराव केचे निवडून येतील असे चित्र होते. मात्र गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे या निवडणुकीत मैदानात होते. यामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाल्याने दादाराव केचे यांना त्याची मोठी किमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे यांनी ३ हजार ८६१ मते घेतली. शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी २ हजार १७४ मते घेतली, तर बाळा जगताप यांनी ३ हजार ६४२ मते घेतल्याने भाजपचे गणित बिघडवले.
हिंगणघाटात समीर कुणावार यांना आमदार करायचे हे आधीच हिंगणघाटातील मतदारांनी ठरवले होते. असले तरी दिग्गज तिसऱ्या व चवथ्या क्रमांकावर फेकले जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. या निवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि मनसेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मनसुबे पार धुळीस मिळविले.
देवळीत तोंडचा घास गेला
देवळीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांचा निसटता विजय झाला. त्यामागेही मतांचे विभाजन हेच कारण आहे. बसपाचे उमेश म्हैसकर यांच्या मतांवर काँग्रेसची भिस्त होती. म्हैसकर यांनी तिसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे काँग्रेसला विजयासाठी शेवटच्या फेरीत चमत्कार घडवावा लागला. यात राकाँचे शशांक घोडमारे यांना ६ हजार ३४३ मते घेऊन भरच टाकली. त्यातच शिवसेनेचे डॉ. निलेश गुल्हाणे यांची उमेदवारी नसती तर भाजपाचे सुरेश वाघमारे यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावता आला नसता.