जुन्या वैमनस्यातून विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:12 IST2019-04-14T22:12:44+5:302019-04-14T22:12:58+5:30

येथील काळापुल भागातील माला राजू कुमरे (४८) या विवाहितेचा नातेसंबंधातील भाच्याने चाकूने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

Married murderer of old vaasin | जुन्या वैमनस्यातून विवाहितेचा खून

जुन्या वैमनस्यातून विवाहितेचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथील काळापुल भागातील माला राजू कुमरे (४८) या विवाहितेचा नातेसंबंधातील भाच्याने चाकूने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
नातेसंबंधातील लग्नासाठी माला या कुटूंबीयांसह नागपूर येथे गेल्या होत्या. तेथे आरोपी राजू देविदास पंधराम (३२) हाही होता. शनिवारी लग्नकार्य पार पडल्यानंतर माला व कुटूंबीय लग्नघरी झोपी गेले. पहाटेला उकाडा जाणवत असल्याने माला घरातील अंगणात झोपण्यास गेल्या. मालाचा डोळा लागल्याची संधी साधून आरोपीने मालावर चाकूने वार करून तिची हत्या केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि खातखेडा तालुक्यातील रहिवासी असून तो पूर्वी देवळी येथे राहत होता. चुलत भावाचा मुलगा म्हणून त्याला आसरा देण्यात आला होता. आरोपी व मृतक यांच्यात यापूर्वी वाद झाल्याने याच वादाचा वचपा काढण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Married murderer of old vaasin