तुळशी विवाहानंतर उडणार विवाहेच्छुकांच्या लग्नाचे बार
By Admin | Updated: November 24, 2015 05:13 IST2015-11-24T05:13:24+5:302015-11-24T05:13:24+5:30
दिवाळीपासूनच अनेकांच्या घरी लग्नाचे वेध लागतात. हिंदू धर्मियांत तुळशी विवाह आटोपल्यावरच लग्न करण्याची प्रथा असल्याने

तुळशी विवाहानंतर उडणार विवाहेच्छुकांच्या लग्नाचे बार
पराग मगर ल्ल वर्धा
दिवाळीपासूनच अनेकांच्या घरी लग्नाचे वेध लागतात. हिंदू धर्मियांत तुळशी विवाह आटोपल्यावरच लग्न करण्याची प्रथा असल्याने सर्वांनाच तुळशी विवाहाची वाट असते. त्यामुळे विवाहयोग्य मुले, मुली तसेच त्यांच्या घरची मंडळी व आप्तेष्ट आदींची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी तुळशीविवाहाला सुरुवात झाल्याने लवकरच लग्नाचे बार उडणार आहे.
मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुुरुवात होते. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पार पडतात. त्यानंतर विवाहेच्छुकांच्या लग्नाचे बेत आखले जातात. अनेकांचा साखरपुडा तुळशीविवाहापूर्वीच आटोपला आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त पाहून कार्यालयाची बुकिंग आणि लग्नाच्या खरेदीची लगबग लवकारच सुरू झाली आहे. सोबतच लग्नपत्रिका, वधुवरांचे कपडे आदींची खरेदीही सुरू झाली आहे.
या सर्वात महत्त्वाची असते ती लग्नाची तारीख म्हणजे मुहूर्त. आपल्या सुविधेप्रमाणे लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी ब्राह्मणांकडे जाण्याची नागरिकांची रिघ लागली आहे. कारण लग्नाची तारीख ठरविल्याशिवाय लग्न कार्यालय आणि पर्यायाने इतर गोष्टी ठरविता येत नसल्याने आधी मुहूर्त पाहिले जातात. त्यामुळे तुळशी विवाहाचे वेध लागल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे.
यंदाही व्हॅलेंटाईनला लग्नाचा बेत आखणाऱ्यांचा हिरमोड
४अनेक जण फेब्रुवारी महिन्यात १४ तारखेला असलेला व्हॅलेंटाईन डे पाहून लग्नाचा बेत आखतात. परंतु गातवर्षीप्रमाणेच यंदाही पंचांगानुसार या दिवशी मुहूर्तच नसल्याचे दिसते. तरीही याच दिवशी लग्न करण्याचे अनेक जणांनी ठरवल्याने व्हॅलेंटाईन डे ला शहरातील बहुतेक कार्यालये अल्पावधीतच आरक्षित केले जातात.
चार ते पाच महिन्यांपासून मंगल कार्यालये आरक्षित
४बरेचदा लग्नाची तारीख निघाल्यावर त्या तारखांमध्ये आवडीचे कार्यालयच मिळत नसल्याची शक्यता असते. त्यामुळे आधी तारखांचा अंदाज घेऊन कार्यालये आरक्षित केली जातात. शहरात चार ते पाच महिन्यापासून कार्यालयाचे आरक्षित केले जात असल्याचे मंगल कार्यालयाचे मालक सांगतात.
यंदा गुढीपाडव्यापर्यंत विवाहाचे ५४ मुहूर्त
४मराठी पंचांगानुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे विवाहमुहूर्ताचे दोन भाग पाडले जातात. त्यानुसार गुढी पालटण्यापूर्वी कार्तिक महिन्यापासून यंदा लग्नाचे ५४ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. इंग्रजी महिन्यांचे चलन जास्त असल्याने अनेकांना मराठी महिन्याचे मुहूर्त कळत नाही. त्यामुळे सरळ सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नोव्हेंबर महिन्यातील २४ तारखेपासून लग्नाचा बार उडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्नाचे २४,२६, २७ असे मुहूर्त आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात ४, ६, ७, ८, ९, १०, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३० जानेवारी महिन्यात १, २, ३, ४, १७, २०, २१, २६, २८, २९, ३०, ३१ फेब्रुवारी महिन्यात १, २, ५, १३, १६, १७, २५, २७, २८, मार्च महिन्यात १, ३, ५, ६, ११, १४, १५, २१, २५, २८, ३१, आणि एप्रिल महिन्यात १, २ आणि ४ असे मुहूर्त आहे.