विवाहितेचा छळ व विनयभंग
By Admin | Updated: September 27, 2014 23:20 IST2014-09-27T23:20:48+5:302014-09-27T23:20:48+5:30
दोन वर्षांपूर्वी लग्न करून पुलगाव येथील जाकीर हुसैन कौलनी येथे राहण्यास आलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केला़ शिवाय तिचा विनयभंग केला़ या प्रकरणी पुलगाव

विवाहितेचा छळ व विनयभंग
पुलगाव पोलिसांत तक्रार : एक वर्षानंतर सासरी आलेल्या सुनेला मारहाण
वर्धा : दोन वर्षांपूर्वी लग्न करून पुलगाव येथील जाकीर हुसैन कौलनी येथे राहण्यास आलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केला़ शिवाय तिचा विनयभंग केला़ या प्रकरणी पुलगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली़
पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, शर्मा ले-आऊट यवतमाळ येथील शेख रेशमा (२३) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी शेख इमरान बेग रा़ जाकीर हुसैन कॉलनी पुलगाव याच्याशी झाला़ यातील इमरान बेग मुंबई येथे वास्तव्यास असून सासरची मंडळ पुलगाव येथे वास्तव्यास आहे़ लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळीने चांगली वागणूक दिली़ यानंतर मात्र माहेरहून पाच ला रुपये आणण्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ करू लागले़ यात पती इमरान बेग, सासरा हापीज बेग, नवऱ्याचा भाऊ इरफान बेग व त्याची पत्नी सैना बेग, मुलगी निखत बेग व तिचा नवरा ननिक बेग अहमद, सासू नसीम बानो यांचा समावेश आहे़ याबाबत रेशमाने तिचा मोठा भाऊ डॉ़ तनवीर शेख व कुटुंबाला माहिती दिली़ त्रास वाढल्याने रेशमा एक वर्षापासून माहेरी यवतमाळ येथे राहत होती़ दरम्यान, तिचा भाऊ डॉ़ तनवीर शेख यांनी रेशमाच्या सासरच्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला़ अनेक वाटाघाटीनंतर २१ सप्टेंबर रोजी रेशमा कुटुंबासह पुलगाव येथे आली़ सर्व पुलगावात अन्यत्र थांबले व तिला सासरी पाठविले़ यावेळी सासरच्या मंडळींनी अश्लील शिवीगाळ करीत तिला मारहाण केली़ इरफान बेग याने वियनभंग करीत कपडे फाडण्याचा प्रयत्न केला़ शिवाय जीवे मारण्याची धकमी दिली़ तिचे कुटुंब हापीज बेग यांच्या घरी दाखल झाले तर त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ याबाबतच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी इरफान हापीज बेग याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ ब, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला़ पूढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत़(कार्यालय प्रतिनिधी)