‘पवित्र रमजान’ला प्रारंभ होताच बाजारपेठही सज्ज

By Admin | Updated: June 20, 2015 02:29 IST2015-06-20T02:29:15+5:302015-06-20T02:29:15+5:30

मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली.

Market starts as soon as 'Ramadan begins.' | ‘पवित्र रमजान’ला प्रारंभ होताच बाजारपेठही सज्ज

‘पवित्र रमजान’ला प्रारंभ होताच बाजारपेठही सज्ज

वर्धा : मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली. यातील अनेक परंपरा आजही मानवाच्या प्रगतीला पोषकच ठरल्याचे दिसून येतात. सर्वधर्मसमभावाची कास धरणाऱ्या या देशात इस्लाम धर्मीयांनी देखील हीच विवेकाची परंपरा सुरू ठेवली. शुक्रवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते.
रोजा म्हणजे मराठी भाषेत उपवास होय. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाढून मेद धातूचे पचन होते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होऊन शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनइंद्रिये शुद्ध होऊन पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होऊन जीवन यशस्वी होते. म्हणूनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खान-पान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लीमबांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील चोवीस तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणच असल्याचे मानले जाते. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नमाजही पठण करतात. सात वर्षापासून तर वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. रोजा सोडणाऱ्याकरिता मस्जिद परिसरात विविध समित्यांकडून सोईसुविधा उपलब्ध करून दिले जाते. घरोघरी कुराणाचे पठणही होते. त्यामुळे शुक्रवारपासून शहरासह जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते.(शहर प्रतिनिधी)
सेवई व खजूरसह अन्य पदार्थांची रेलचेल
रमजानचा उत्सव साजरा करण्याकरिता मुस्लिम बांधवांनी जय्यत तयारी केली. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. रमजाननिमित्त कुटुंबातील सगेसोयरे आपल्या मूळ घरी उत्सहाने उपस्थित होतात. कुराणचे पठण करण्यासाठी धार्मिक कार्यक्रमामध्ये श्रद्धेने सहभागी होतात. मस्जिद परिसरात विविध प्रकारचे खजूर आणि खीरखुरमा साठी वेगवेगळ्या प्रकारच्या शेवता विक्रीस पहावयास मिळतात. खास अफगाण देशातून हे खजूर मागविले जातात.
आबालवृद्धांसोबत मुस्लीम युवक युवतीच नव्हे लहान मुलेही रोजा ठेवत असतात.

Web Title: Market starts as soon as 'Ramadan begins.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.