बाजार समितीचे फेर लेखापरीक्षण सुरू
By Admin | Updated: June 16, 2016 02:31 IST2016-06-16T02:31:34+5:302016-06-16T02:31:34+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत माजी आमदार दादाराव केचे यांनी फेरलेखा परीक्षणाची मागणी केली होती.

बाजार समितीचे फेर लेखापरीक्षण सुरू
आर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत माजी आमदार दादाराव केचे यांनी फेरलेखा परीक्षणाची मागणी केली होती. ती मान्य झाली असून फेर लेखा परीक्षण सुरू करण्यात आले आहे. भंडारा येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षण वर्ग एक चे एस.एस. सुपे हे परीक्षण करीत आहेत.
पणन महासंचालनालयाकडील तक्रारीत २ लाख ३७ हजार रुपयांची बेहिशेबी उचल केल्याचे नमूद आहे. बाजार समितीने एका एजन्सीला लाखो रुपये कामाव्यतिरिक्त दिलेत. ती वसुली अद्याप झाली नाही. यामुळे फेरलेखा परिक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. यावरून पणन महासंघाचे संचालक किशोर तोष्णीवाल यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) १९६३ व त्या अंतर्गत नियम १९६७ चे नियम ११६ (७) अन्वये फेरलेखा परीक्षणाचे आदेश दिलेत. यावरून सुपे यांनी २०१३ ते २०१५ या दरम्यानच्या लेखा परीक्षणास प्रारंभ केला आहे. याबाबत १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आहे. आदेशाप्रमाणे चौकशी सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजीव पावडे यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)