पाचपर्यंतची मुभा असताना दुपारी दोन वाजताच बाजारपेठ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:11+5:30

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश कार्यान्वित केलेत. यात व्यावसायिक प्रतिष्ठाना संबंधित शिथिलता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत होती.

The market is closed at 2 pm when it is allowed till 5 pm! | पाचपर्यंतची मुभा असताना दुपारी दोन वाजताच बाजारपेठ बंद!

पाचपर्यंतची मुभा असताना दुपारी दोन वाजताच बाजारपेठ बंद!

ठळक मुद्देग्राहकांचा दुष्काळ। केळझर, सेवाग्राम येथे संचारबंदी शिथिलतेनंतरचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : जिल्हा प्रशासनाने व्यावसायिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मुभा दिली असतानाही शनिवारला केळझरची बाजारपेठ दुपारी २ वाजताच बंद झाली. दोन नंतर ग्राहक फिरकतच नसल्याने दुकानात विनाकारण एकटेच कशासाठी बसायचे असा सवाल येथील दुकानदारांनी केला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश कार्यान्वित केलेत. यात व्यावसायिक प्रतिष्ठाना संबंधित शिथिलता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत होती.
या वेळेत रोटेशन पद्धतीने व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची मुभा होती. आणि नागरिकही या वेळेतच खरेदीसाठी घराबाहेर पडत होेते. परंतु शुक्रवारला जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश काढत सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिकांना दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली. परंतु केळझर मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडी ठेवली त्यामुळे दुपारी दोन नंतर केळझरच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी व जमावबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. सुधारित आदेश काढत प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शिथीलतेत वेळोवेळी बदल केला. काल परवा पर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ अशी शिथीलतेची वेळ होती त्यामुळे नागरिक या वेळेतच आपली कामे आटोपत असत. याची एकप्रकारे नागरिकांना सवयच झाल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. उन्हाचा वाढता पारा तर वादळी वातावरण यामुळे नागरिकही दुपारनंतर सहसा घराबाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली असली तरी दुपारी दोन वाजेनंतर ग्राहक फिरकतच नसल्याने दुकानात बसून उपयोग काय असा सवाल व्यावसायिक करताना दिसत आहे. ग्रामीण भागात जनजीवनावर परिणाम झाला.

वेळ वाढला; पण ग्राहकच नसल्याने दुकाने बंद
सेवाग्राम : जिल्हा प्रशासनाने दुकानदार आणि ग्राहकांची सोय व्हावी यासाठी शनिवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे पण; ग्राहकच नसल्याने मेडिकल चौकातील भाजीपाला,फळ दुकानदारांनी दुपारी २ वाजताच आपली दुकाने बंद करून घरचा रस्ता पकडला. गर्दी होऊ नये,शिस्त रहावी यासाठी दुकानदारांसाठी वेळेचे निर्बंध घालण्यात आले होते.सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू असायचे.नागरीकांना पण याची सवय लागली होती. पारा वाढल्याने लोकांनी दुपारनंतर घराबाहेर पडणे टाळले आहे.

पाच वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी दुपारी दोन नंतर ग्राहक फिरकतच नसल्याने विनाकारण दुकानात बसण्यापेक्षा घरी गेलेले बरे
- किशोर नखाते, किराणा व्यवसायी

Web Title: The market is closed at 2 pm when it is allowed till 5 pm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.